शहरं
Join us  
Trending Stories
1
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
2
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
3
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
4
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
5
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
6
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
7
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
8
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
9
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
10
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
11
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
12
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
13
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
14
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
15
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
16
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
17
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
18
अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेतही कान्समध्ये पोहोचला, आईचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
'राजा शिवाजी' ठरला ब्लॉकबस्टर! १०० कोटी कमावणारा मराठीतला दुसरा सिनेमा, 'सैराट'चा विक्रम मोडला
20
"दीपिकाच्या शरीरावर जखमांच्या खुणा, हुंड्यासाठी केली हत्या"; काकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे भाववाढीची शेतकर्‍यांना धास्ती

By admin | Updated: May 18, 2014 20:18 IST

सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढत गेला व उत्पन्नात मात्र घट झाली; शिवाय सोयाबीनला हमीभाव नाही.

सायखेड (अकोला) : सततच्या नापिकीमुळे मानसिकरित्या खचलेल्या बार्शिटाकळी तालुक्यातील शेतकर्‍यांना आता बियाणे भाववाढीची भीती सतावत आहे. कपाशीला मागे ठेवत शेतकर्‍यांनी बर्‍यापैकी सोयाबीनला प्राधान्य दिले; परंतु हळूहळू मात्र सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढत गेला व त्या प्रमाणात उत्पन्नात मात्र घट झाली. याशिवाय भावाची हमी नसल्याने तर शेतकर्‍यांना मिळेल त्या भावाने सोयाबीन विकावे लागले. यावर्षीची शेतकर्‍यांची दशा तर पाहावेनाशी आहे. खरिपात अतिवृष्टीचा, तर रब्बी हंगामात शेतकर्‍यांना गारपिटीचा तडाखा बसला. शेतकर्‍यांचे पार कंबरडे मोडले. खिशात दमडीही नाही, सोसायट्यांनी कर्ज अद्याप दिले नाही. पेरणीचे दिवस उंबरठ्यावर आले असताना सोयाबीनच्या बियाण्याचे भाव वाढणार असल्याची चर्चा आहे. व्यापार्‍यांकडे सोयाबीन बियाण्याचा माल येत आहे. नामांकित कंपन्याच्या ३0 किलोच्या सोयाबीनच्या बॅगवर २७00 रुपयांची एमआरपी प्रिंट करण्यात आली आहे. महाबीजचा भाव निघायचा आहे. महागड्या किमतीचे बियाणे खरेदी केल्यानंतर उत्पन्न होत नसल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलाआहे. बियाणे घेताना शेतकर्‍यांनी विशिष्ट कंपनीचा आग्रह न धरता डबल लेबल असलेले बियाणे निवडल्यास काही विशिष्ट कंपन्याची मोनोपली राहणार नाही व त्यामुळे कृत्रिम भाववाढीस तोंड देण्याची वेळ शेतकर्‍यांवर येणार नाही. सोयाबीनपाठोपाठ या भागात घेतले जाणारे दुसरे पीक कपाशीचे आहे. यावर्षी कपाशीचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. गतवर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकले नाही. हरभरा पिकाचे गारपिटीने नुकसान तर झालेच; परंतु हरभर्‍याला सध्या घेवालही नाही. या पृष्ठभूमीवर कपाशीचा पर्याय शेतकरी स्वीकारण्याच्या तयारीत आहेत. बियाणे खरेदी केल्यानंतर औषधांचा खर्च हा सुद्धा आवाक्याबाहेरचा आहे. फवारणी केली नाही तर अळ्या पीक फस्त करतात. यामुळे काय करावे, हे शेतकर्‍यांना सुचत नाही.