‘बीओटी’ प्रकल्पासाठी अकोला शहरात जागेचा शोध

By Admin | Updated: July 13, 2014 21:35 IST2014-07-13T20:04:43+5:302014-07-13T21:35:37+5:30

शासकीय जागांचा उपयोग बीओटी प्रकल्पासाठी करण्याचा महापालिकेचा मानस आहे. तसेच कापशी तलवाच्या सौंदर्यीकरणासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे.

Search for space in Akola city for 'BOT' project | ‘बीओटी’ प्रकल्पासाठी अकोला शहरात जागेचा शोध

‘बीओटी’ प्रकल्पासाठी अकोला शहरात जागेचा शोध

अकोला : शहरातील शासकीय जागांचा उपयोग बीओटी प्रकल्पासाठी करण्याचा महापालिकेचा मानस आहे. तसेच कापशी तलवाच्या सौंदर्यीकरणासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. याकरिता मुंबईस्थित 'फोर्टरेस' तांत्रिक सल्लागार कंपनीचे अभियंता व मनपा अधिकार्‍यांनी शनिवारी शहरातील जागेची पाहणी केली. शहराला अतिक्रमणमुक्त करण्यासह रोजगार व व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशातून शासकीय जागांवर ह्यबांधा, वापरा, हस्तांतरित कराह्ण यानुसार प्रकल्प उभारण्याचा आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांचा मानस आहे. त्यादिशेने प्रशासनाने सकारात्मक पाऊले उचलण्यास सुरुवात केल्याचे तूर्तास दिसत आहे. शहरानजिक कापशी तलावाला पर्यटनस्थळ बनविण्यासाठी त्याठिकाणी अत्याधुनिक रिसॉर्ट व लहान मुलांसाठी सुसज्ज बगिचा तयार करण्याचा प्रयत्न आहे. या सर्व कामांसाठी निविदा प्रक्रिया राबवण्यापूर्वी संबंधित ठिकाणी आणखी काय करता येईल, याकरिता प्रशासनाने मुंबईस्थित ह्यफोर्टरेसह्ण तांत्रिक सल्लागार कंपनीची मदत घेतली आहे. कंपनीच्यावतीने प्रकल्प अभियंता अन्वर शेख यांनी शनिवारी कापशी तलावासह शहरातील शासकीय जागेची पाहणी केली. या पथकासाबेत महापालिकेचे बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर, सहाय्यक नगर रचनाकार संदीप गावंडे सोबत होते.

Web Title: Search for space in Akola city for 'BOT' project