शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

‘सध्याच्या विज्ञानापेक्षा उद्याचे विज्ञान अधिक प्रगत!’ - डॉ. नरेंद्र देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:32 IST

विज्ञानाकडे जाण्याची गरज असल्याचे मत मुंबई होमी भाभा विज्ञान केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र देशमुख यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: विज्ञानामुळे प्रत्येक क्षेत्रात क्रांती झाली आहे. हे विज्ञानाचे शतक आहे. मोबाइल केवळ बोलण्याचे साधन होते; परंतु आता मोबाइल संगणकासारखेच काम करतो. भारताला सक्षम करण्यासाठी विज्ञानात प्रगती साधावी लागेल. समाजाची गरज लक्षात घेऊन संशोधन करावे लागेल. सध्याच्या विज्ञानापेक्षा उद्याचे विज्ञान अधिक प्रगत असणार आहे. त्यासाठी विज्ञानाकडे जाण्याची गरज असल्याचे मत मुंबई होमी भाभा विज्ञान केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र देशमुख यांनी येथे केले.प्रादेशिक विद्या प्राधिकरण नागपूर, शिक्षण उपसंचालक, माध्यमिक शिक्षणाधिकारी आणि विज्ञान अध्यापक मंडळाच्यावतीने शनिवारी न्यू इंग्लिश हायस्कूलमध्ये आयोजित ४५ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन विभागीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर डॉ. श्रीहरी मांडवगणे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद, ‘हॅन्डस् आॅन अ‍ॅक्टिव्हिटी’चे प्रा. रवींद्र गोडबोले, अकोला एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष भाऊसाहेब मांडवगणे व सचिव अमरावतीकर उपस्थित होते.कार्यशाळेमध्ये ‘ट्रान्सफॉर्मेशन थ्रु इनोव्हेशन’ या विषयावर डॉ. श्रीहरी मांडवगणे यांनी जिज्ञासा, हिंमत, आत्मविश्वास, सातत्य, कृतिशीलता, ध्येय आणि ऊर्जा क्षमता या मूलमंत्राचा वापर केल्यास यश निश्चित मिळते, असे सांगितले. ‘बेसिक कन्सेप्टस् इन सायन्स’ या विषयावर प्रा. रवींद्र गोडबोले यांनी मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी समाजासमोरील समस्या डोळ्यासमोर ठेवून संशोधन करण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.कार्यशाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनामध्ये दर्जेदार, प्रकल्प तयार करताना कोणकोणत्या प्रमुख बाबी विचारात घ्याव्या लागतात. इनवेशन आणि इनोव्हेशन यातला फरक, प्रतिकृती सादरीकरणाचे बारकावे आदींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान अध्यापक मंडळाचे विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. रवींद्र भास्कर यांनी केले. संचालक सुरेश किरतकर यांनी केले. अतिथींचा परिचय शिक्षिका इंगळे यांनी करून दिला.आभार शशिकांत बांगर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका मेधा देशपांडे, सुनील वावगे, अनिल जोशी, विश्वास जढाळ, संतोष जाधव, मनीष निखाडे, धम्मदीप इंगळे, मुरलीधर थोरात, प्रमोद पांडे, आनंद पांडे व चंद्रकांत गव्हाणे यांनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)

टॅग्स :Akolaअकोलाscienceविज्ञान