शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
6
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
7
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
8
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
9
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
10
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
11
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
12
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
13
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
14
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
15
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
16
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
17
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
18
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
19
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
20
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर

पोषण आहार पुरवठा निविदेत बचत गट अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 1:43 PM

जिल्ह्यातील काही तालुक्यांत बचत गटांना निविदाच सादर करता आल्या नसल्याची माहिती आहे.

अकोला : गरोदर, स्तनदा माता, सहा वर्षे वयोगटातील बालकांना गरम, ताजा आहार पुरवठा करण्यासाठी निविदा प्रक्रियेतून बचत गटांची निवड प्रक्रिया सुरू झाली. या प्रक्रियेतील अटी व शर्तींमुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांत बचत गटांना निविदाच सादर करता आल्या नसल्याची माहिती आहे. त्याबाबत अमरावती जिल्ह्यात केलेला बदल अकोला जिल्ह्यातही लागू करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जात आहे.सर्वोच्च न्यायालयाने ८ मार्च २०१९ रोजी राज्यातील ठरावीक १८ संस्थांची कामे रद्द करून बचत गटांना देण्याचा आदेश दिला. त्यावेळी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने महिला बचत गटांना ही कामे देता महाराष्ट्र स्टेट कॉ-आॅप. कन्झ्युमर्स फेडरेशनला कच्चे धान्य पुरवठ्याचा आदेश दिला. त्यानंतर महिला बचत गटांकडून कच्च्या धान्याचा पुरवठा करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागाने आॅगस्ट २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया सुरू केली. निविदा प्रक्रियेत सहभागी बचत गटांची प्रमाणपत्रे, उत्पादन केंद्र, किचन पडताळणी करण्यासाठी तालुकास्तरीय उपसमितीमध्ये अध्यक्ष म्हणून तहसीलदार आहेत. त्या समित्यांनी जिल्ह्यातील ५८ बचत गटांचा पडताळणी अहवाल २० नोव्हेंबरपर्यंतच मागविण्यात आला होता. ६ फेब्रुवारीपर्यंत बार्शीटाकळी तालुका वगळता इतरांकडून तो प्राप्त झाला नव्हता. त्यावेळी पुढील दोन दिवसांत अहवाल प्राप्त होतील, असे महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी सांगितले. त्यानंतर अद्यापही निविदा प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. त्यामुळे अकोल्यासह इतरही जिल्ह्यांमध्ये आहार पुरवठ्याचे काम महाराष्ट्र कन्झ्युमर्स को-आॅप. फेडरेशनकडूनच सुरू ठेवण्याचे प्रयत्न त्यातून केले जात आहेत.विशेष म्हणजे, निविदा प्रक्रियेत पात्रतेच्या अटी व शर्तीमुळे अनेक महिला बचत गटांना त्यामध्ये सहभागीच होता आले नाही. परिणामी, काही तालुक्यांतील निविदा प्रक्रिया निरंक दर्शविली जात आहे. त्या तालुक्यामध्ये बचत गटांची निवड होणार नाही. ते काम कोणाला द्यावे, याची तयारी आता महिला व बालकल्याण विभागाला करावी लागणार आहे.

टॅग्स :Akolaअकोला