शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीओने’ नऊ महिन्यात केला २४ कोटींचा महसूल जमा

By admin | Updated: January 21, 2015 01:01 IST

उद्दिष्टापासून अकोला जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन विभाग माघारला.

अकोला: शासनाच्या तिजोरीमध्ये कोट्यवधी रुपयांचा महसूल जमा करणारा उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) यंदा दिलेल्या उद्दिष्टापासून माघारला असून, विभागाने गत नऊ महिन्यांमध्ये २४ कोटी ७७ लाख ५५ हजार रुपयांचा महसूल गोळा करण्यात यश मिळविले. परंतु उद्दिष्टापेक्षा हा महसूल ७ कोटी रुपयांनी कमी आहे. गत दोन महिन्यांपासून आरटीओ कार्यालयाचे कामकाज धिम्या गतीने सुरू आहे. त्याचाच परिणाम की काय म्हणून आरटीओला यंदा दिलेले लक्ष्य गाठण्यात अपयश आले. उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला वाहनांचे नोंदणी शुल्क, विलंब शुल्क, शोरूम निरीक्षण शुल्क, वनटाईम टॅक्स, पर्यावरण कर, वाहन क्रमांक शुल्क आणि दंड आदी प्रकारांमधून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल प्राप्त होतो. हा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा होतो. २0१४ व १५ या वित्तीय वर्षामध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाला ४२ कोटी ६७ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. या उद्दिष्टानुसार उपप्रादेशिक परिवहन अकोला विभागाने गत नऊ महिन्यांमध्ये २४ कोटी ७७ लाख ५५ हजार रुपयांचा महसूल गोळा केला. उपप्रादेशिक परिवहन विभागाला दिलेल्या उद्दिष्टानुसार आतापर्यंंत शासनाच्या तिजोरीमध्ये ३१ कोटी ५७ लाख जमा करायचे होते; परंतु यंदा हे उद्दिष्ट गाठण्यामध्ये आरटीओला अपयश आले आहे. अद्याप उद्दिष्टापासून आरटीओ विभाग ६ कोटी ८0 लाख रुपयांनी माघारला आहे. तीन महिन्यांमध्ये ७ कोटी रुपयांचा महसूल गोळा करणे ही बाब अशक्यप्राय आहे.