रिसोड महिला बालविकास संरक्षण अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

By Admin | Updated: September 9, 2016 20:50 IST2016-09-09T20:50:26+5:302016-09-09T20:50:26+5:30

पाच हजार रुपयांची लाच स्विकारणार-या रिसोड पंचायत समितीचे महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी धिरज शंकर उचित यांना लाचलुचपत विभागाने आपल्या जाळ्यात ओढले आहे.

Risod Women Child Development Conservation Officer Anti Corruption | रिसोड महिला बालविकास संरक्षण अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

रिसोड महिला बालविकास संरक्षण अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

style="text-align: justify;"> 
ऑनलाइन लोकमत 
वाशिम, दि. ९ - नात्यातील व्यक्तीविरुध्द दिवाणी व फौजदारी न्यायालय (क.स्तर) रिसोड कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणात जमानीतीचा ताण येवू देणार नाही अशी बतावणी करुन पाच हजार रुपयांची लाच स्विकारणार-या रिसोड पंचायत समितीचे महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी धिरज शंकर उचित यांना लाचलुचपत विभागाने आपल्या जाळ्यात ओढले आहे. सदर घटना ९ सप्टेंबर दुपारी ४.१५ च्या सुमारास वाशिम बसस्थानकासमोरील परिसरात घडली.
 
रिसोड तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या तक्रारदाराने पंचायत समितीचे महिला व बालविकास विभागाचे संरक्षण अधिकारी धिरज उचित यांनी आपल्या नात्यातील व्यक्तीविरुध्द दिवाणी व फौजदारी न्यायलय (क.स्तर) रिसोड येथे सुरु असलेल्या प्रकरणात मदत करु शकतो असे सांगून जमानतीचा ताण येवू देणार नाही आणि या प्रकरणी योग्य मार्ग सांगेल याकरिता पाच हजार रुपयाची मागणी केली होती, असे आपल्या तक्रारीत म्हटले होते. 
 
तक्रारदाराच्या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधीक्षक आर.व्ही.गांगुर्डे यांनी सापळा रचून आरोपी लोकसेवक धिरज उचित (३२) संरक्षण अधिकारी महिला व बालकल्याण विभाग पं.स.रिसोड यांना लाचेची ५ हजार रुपयाची रक्कम स्विकारताना रंगेहाथ अटक करुन ५ हजार रुपए त्यांच्याकडून जप्त केले.
 
या सापळ्यामध्ये लाचलुचपत विभागाच्या पथकाचा समावेश होता. पोलिस अधीक्षक महेश चिमटे, अप्पर पोलिस अधीक्षक विलास देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक गांगुर्डे व त्यांच्या पथकाने हा सापळा रचला होता. या प्रकरणी आरोपी उचित यांच्याविरुध्द कलम १३ (१), (ड) सहकलम १३ (२) लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Risod Women Child Development Conservation Officer Anti Corruption