शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

महसूल व वनविभागात जुंपली

By admin | Updated: August 3, 2014 00:29 IST

जमीन देण्यास वनविभागाचा विरोध

आकोट: आकोट विभागाची प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी वनविभागाचे ताब्यातील जमीन आपले नावे करवून घेताना वनविभागास बाजू मांडण्याची वाजवी संधी न दिल्याने खवळलेल्या वनविभागाने राज्य शासनाकडे दाद मागितली आहे. राज्य शासनानेही यासंदर्भात वनविभागाचे विरोधी भूमिका घेतल्यास वनविभाग न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याने महसूल विभागाची प्रशासकीय इमारत वांध्यात येण्याची शक्यता बळावली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील सर्वात पहिला आणि सर्वात मोठा प्रकल्प म्हणून गणल्या जातो. या प्रकल्पाच्या आकोट येथील कार्यालयासाठी शहरातील स. क्र. २७/२ मधील १६ हजार १२ गुंठे जमीन सन १९६५ मध्ये वनविभागास संपादित करून देण्यात आली. त्यातील ७ एक्कर २0 गुंठे जमीन वनविभागाच्या प्रकाष्ठ आगाराकरिता ठेवली गेली. त्या जमिनीवर डोळा असलेल्या महसूल विभागाने निर्धारित कारणाकरिता सदर जमिनीचा वापर होत नसल्याने व भविष्यात होण्याची शाश्‍वती नसल्याने ही जमीन महसूल विभागाच्या प्रशासकीय इमारतीसाठी देण्यात यावी, अशी शिफारस केली. त्यावर जलद पाऊले उलचून महसूल विभागाने सदर जमीन आपले नावे करून जमीन ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. तथापि महसूलच्या या कृत्यास वनविभागाने कडाडून विरोध केला आहे. त्यासोबतच सदर जमीन आपल्या किती उपयोगाची आहे, याचा तपशिलही वनविभागाने शासनास सादर केला आहे. मेळघात व्याघ्र प्रकल्पासाठी करोडो रुपयाच्या खर्चासह कर्मचारी संख्येतही वृद्धी करण्यात आली आहे. आधीच अनेक कर्मचारी शहरात राहत आहेत. त्यांच्यासह या नवीन कर्मचार्‍यांच्या वसाहतीचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला आहे. त्यांचे अंदाजपत्रक बनविण्याची प्रक्रिया सुरू आहे. निधी मंजुर होताच ही वसाहत उभारणीचे कामास प्रारंभ केला जाईल. या दोन्ही महत्त्वपूर्ण कामासाठी भविष्यात ही जमीन वनविभागास कामी येणार असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. या संदर्भात अमरावती विभागीय आयुक्त यांचे दालनात २६ जून २0१४ रोजी बैठक घेण्यात आली. परंतु सदर बैठकीसाठी उपवनसंरक्षक वन्यजीव विभाग आकोट यांना निमंत्रित केल्या गेले नाही. उलट वनविभागाचा युक्तिवाद फेटाळून उपविभागीय अधिकारी आकोट यांनी सदर जमिनीचा गत ५0 वर्षात कोणताही उपयोग घेण्यात आला नसल्याचा जावई शोध लावणारा अहवाल वरिष्ठांस सादर केला. त्यासोबतच वनविभागाने कर्मचारी वसाहतीचा प्रस्ताव तयार केला किंवा नाही, याची शहानिशा न करता ह्यवसाहतीचा प्रस्ताव असण्याची शक्यता दिसून येत नाहीह्ण असा शेरा केवळ वनविभागाची जागा बळकावण्याचे उद्देशाने अहवालात लिहिला. एनटीसीएच्या सर्वेनुसार देशातील ४६ व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा ७ व्या स्थानावर आहे. त्याच्या अधिक विकासासाठी ही जमीन अत्यावश्यक आहे. या सार्‍या विरोधी वातावरणात या जमिनीसंदर्भात अंतिम निकाल काय येतो, याकडे सार्‍यांचे लक्ष लागून आहे.