शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पंदेकृवित होणार खारपणपट्टयावर संशोधन !

By admin | Updated: February 17, 2015 00:45 IST

लोकमत इम्पॅक्ट; एमसीईएआरचा महत्वपूर्ण निर्णय.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विदर्भातील शापित खारपाणपट्टय़ाच्या विकासासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राचा प्रस्ताव भारतीय कृषी (आयसीएआर) संशोधन व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन (एमसीईएआर) परिषदेकडे पाठवला होता. या प्रस्तावावर एमसीईएआरने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले असून, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला ह्यक्षारपड जमिन संशोधन केंद्रह्ण देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी विद्यापीठात खारपाणपट्टय़ासाठी संशोधन केंद्र मिळावे, यासाठी लोकमतने हा मुद्दा वेळोवेळी प्रभावीपणे उचलून धरला, हे विशेष.पश्‍चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्‍चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४0 ते ५0 किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८९२ गावं या खारपाणपट्टय़ात मोडतात. हे क्षेत्र सुमारे तीन लाख हेक्टर असून, इतर महसूल विभागांच्या तुलनेत अमरावती विभागातील सिंचन क्षेत्र १0 टक्क्य़ांचा आत आहे. भरिस भर खारपाणपट्टय़ाचा शाप या भागाला आहे. या खारपाणपट्टय़ातील माती चोपण असून, पाणी खारे आहे. या पाण्यात अनेक प्रकारचे क्षार असल्याने कृषिमाल उत्पादनावर त्याचा परिणाम तर होतोच, शिवाय मानवी आरोग्यालाही हे पाणी घातक असल्याने वर्षानुवर्षे त्याचे दुष्परिणाम या भागातील जनता सहन करीत आहे. उत्पादन कमी होत असल्याने त्याचा परिणाम शेतकर्‍यांच्या एकूण सामाजिक व आर्थिक स्तरावर झालेला आहे. दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या खारपाणपट्टय़ावर संशोधन करण्यासाठी स्वतंत्र केंद्र या विद्यापीठात देण्यात यावे, या मागणीचा प्रस्ताव डीसेंबर २0१३ व जानेवरी २0१५ मध्ये भारतीय कृषी संशोधन व महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेकडे पाठविला होता.या पार्श्‍वभूमीवर कृषी विद्यापीठाच्या खारपाणपट्टा स्वतंत्र संशोधन केंद्राकडे या भागातील जनतेचे लक्ष लागले होते. यावेळी एमसीईएआरने या प्रस्तावाची दखल घेतली असून, शुक्रवार १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या एमसीईएआरच्या महत्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. दिलीप मानकर यांनी सांगीतले. या प्रस्तावावर एमसीईएआरने शिक्कामोतर्तब केले असून, शासनाकडे शिफारस केली आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाला हे केंद्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचेही ते म्हणाले.