शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

मालमत्ता हस्तांतरण शुल्कापासून सुटका!

By admin | Updated: November 19, 2016 01:41 IST

आयुक्तांचा निर्णय; अकोलेकरांना आता भरावे लागणार नाममात्र शुल्क

आशिष गावंडे अकोला, दि. १८- महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे हस्तांतरण करण्याच्या बदल्यात मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाकडे जमा केल्या जाणार्‍या हस्तांतरण शुल्कापासून आयुक्त अजय लहाने यांनी अकोलेकरांची सुटका केली आहे. मालमत्ता हस्तांतरणापोटी कर वसुली विभागाकडे मालमत्ता खरेदी दराच्या एकूण एक टक्का रक्कम जमा करणे बंधनकारक होते. असा कोणताही नियम नसताना प्रशासनाकडून वर्षाकाठी लाखो रुपयांची रक्कम वसूल केल्या जात होती. आयुक्तांच्या धोरणात्मक निर्णयानंतर नागरिकांना नाममात्र शुल्क जमा करावे लागेल.मालमत्तांच्या खरेदी-विक्रीचे सोपस्कार पार पाडल्यानंतर राज्य शासनाकडे महसूल जमा केला जातो. महापालिका क्षेत्रातील मालमत्तांचे हस्तांतरण झाल्यानंतर खरेदी केलेल्या मालमत्ताधारकाच्या नावाने मनपात कर जमा क रणे क्रमप्राप्त ठरतो. कर जमा करणे अकोलेकरांचे कर्तव्य असले, तरी महापालिकेच्या कर वसुली विभागाकडून मालमत्तांच्या हस्तांतरणापोटी खरेदी दराच्या एकूण एक टक्का रक्कम जमा करणे बंधनकारक करण्यात आले होते. ही रक्कम जमा केल्यानंतरच मालमत्ताधारकाच्या नावाने मालमत्ता कराची आकारणी व नोंद केली जात होती. उदा. शहरात किमान १0 लाख रुपये कि मतीची मालमत्ता खरेदी केल्यानंतर हस्तांतरण शुल्काच्या बदल्यात मनपाकडे १0 हजार रुपये जमा करणे भाग होते. मुळात महाराष्ट्र महापालिका अधिनियमात अशी कोणतीही तरतूद नसताना मनपा प्रशासनाकडून हस्तांतरण शुल्काची वसुली केली जात होती, हे येथे उल्लेखनीय. महापालिकेच्या आयुक्त पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर हा प्रकार आयुक्त अजय लहाने यांच्या निदर्शनास आला. मुळात मालमत्तेचे हस्तांतरण झाल्यानंतर कर लागू करण्यासाठी मालमत्ताधारकाच्या नावाची नोंद करण्याची जबाबदारी मनपाच्या कर वसुली विभागाची आहे. त्यामुळे आयुक्त लहाने यांनी मालमत्ता हस्तांतरण शुल्क रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत अकोलेकरांना मोठा दिलासा दिला आहे. यापुढे केवळ ५00 रुपये हस्तांतरण शुल्क आकारले जाईल. प्रशासनाचा हा प्रस्ताव सत्ताधारी भाजप-शिवसेनेने मंजूर केला, हे विशेष. नियमाचा आधार नाहीमालमत्ता हस्तांतरणाच्या गोंडस नावाखाली अकोलेकरांच्या खिशातून वर्षाकाठी लाखो रुपये वसूल करण्याचे काम मनपाकडून सुरू होते. हस्तांतरण शुल्क वसुलीला कोणताही कायदेशीर आधार नव्हता. हा निर्णय घेण्यासोबतच आर्थिक वर्ष संपताच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जे मालमत्ताधारक कर जमा करतील, त्यांना करात पाच टक्के सूट देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.