शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा पुनर्वापर; बचतीची आवश्यकता

By admin | Updated: July 14, 2014 01:04 IST

लोकमत इनिशिएटिव्ह थेंब महत्त्वाचा उज्ज्वल भविष्यासाठी

अकोला : कायम पाण्याच्या दृष्काळासाठी ओळख असलेल्या अकोलेकरांना पाच दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. पाऊस येण्यास होत असलेल्या विलंबामुळे धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय आता सोडण्याची गरज आहे. पाणीबचतीसाठी अकोलेकरांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी पुढे येण्याची हीच वेळ आहे.

अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील काही शेतकर्‍यांनी पाण्याच्या पुनर्वापरास सुरुवात केली आहे. तालुक्यातील आदिवासी बहुल भागात १0 हजार हेक्टरवर जलपुर्नभरणाचे काम केल जाते. राज्यातील काही प्रमुख शहरात महापालिका हद्दीत रेनवॉटरहार्वेस्टिंग करण्यात आले असून पालिकांनी अशा सोसायटी व नागरिकांना पाणीपट्टीत सुट दिली आहे. अकोला शहरातही हा प्रयोग नागरिकांनी राबवावा यासाठी महापालिकेसोबतच नागरिकांनी स्वयंस्पूर्तीने पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षी उन्हाळा सुरु झाला की पाणी बचतीबाबत चर्चा होते. विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरू झाला, की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे. लोकसंख्या वाढत आहे. पाणीसाठवण क्षमता मात्र वाढणार नाही. उपलब्ध पाणीच आपल्याला पुरवून वापरावे लागणार आहे, त्यामुळे आतापासूनच सुरुवात करावी लागणार आहे. महापालिकेकडून उपाययोजना होतील म्हणून गप्प बसून चालणार नाही. वैयक्तिक पातळीवरही आपण पाणीबचतीसाठी काळजी घ्यायला हवी.

** अकोलेकरांनो लक्षात ठेवा.. खरे तर आपण पाण्याशी नीट वागत नाही. अर्मयाद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या बेबंद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने अकोलेकरांवर आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे. अकोलेकरांना आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो.

- आंघोळ बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लिटर शॉवरखाली : १00 लिटर

- दाढी नळ सोडून दाढी केल्यास : १0 लिटरमग घेऊन : १ लिटर

- ब्रश नळ सोडून केल्यास : १0 लिटरमग घेऊन : १ लिटर

- कपडे नळाखाली : ११६ लि.बादलीचा वापर केल्यास : ३६ लिटर

- मोटार पाईप वापरल्यास : १00 लि.बादलीचा वापर केल्यास : १८ लिटर

- हात धुण्यासाठी नळाखाली : १0 लिटर मग घेऊन : अर्धा लिटर

- शौचविधी फ्लश केल्यास : २0 लिटर बादलीचा वापर केल्यास : ६ लिटर

** सामूहिक जबाबदारी सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळकोंडाळ्यांची तातडीने दुरुस्ती करा येत्या पावसाळ्य़ात छतावर पडणार्‍या पाण्याचे संकलन करून त्याचे पुनर्भरण करण्यासाठी पुढाकार घ्या जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे. नैसर्गिक जलस्रोत व नदी काठावरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून अकोल्याची पुन्हा ह्यग्रीन सिटीह्ण ही ओळख निर्माण करावी. वैयक्तिक जबाबदारी नागरिकांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा. आंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढचे पाणी घ्यावे. नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी. उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर न करता पुनर्प्रक्रिया केलेल्या पाण्याचा उपयोग करावा. नैसर्गिक साधनसंपत्तीचे आपण विश्‍वस्त असल्याचे भान ठेवून काही व्यक्ती, संस्था, गृहनिर्माण सोसायटी यांनी यापूर्वीपासूनच पाणी बचतीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामध्ये छतावरील पाण्याचे संकलन, पुनर्भरण व पुनर्वापरासाठीचे प्रयोग यशस्वीपणे राबविले आहेत. त्यांच्या कामातून अनेकांना प्रेरणा मिळेल.

'लोकमत' च्या माध्यमातून त्यांचे कार्य समाजासमोर आणून त्याला बळ देण्याचा आमचा मानस आहे. आपल्या उपक्रमाची/प्रयोगाची माहिती 'लोकमत' कार्यालयात पाठवा.

पत्ता : सेठी हाईटस्, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, अकोला ४४४ 00१, फोन (0२४) २४४२६६१ (ई-मेल :lokmatcityakola@gmail.com)

 - निवासी संपादक