४८ तासांत बरसणार मुसळधार पाऊस!

By Admin | Updated: August 29, 2015 00:25 IST2015-08-29T00:25:01+5:302015-08-29T00:25:01+5:30

हवामान खात्याने वर्तविली शक्यता.

Rainfall in 48 hours! | ४८ तासांत बरसणार मुसळधार पाऊस!

४८ तासांत बरसणार मुसळधार पाऊस!

अकोला : विदर्भात येत्या ४८ तासांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात मुसळधार पावसाची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, मान्सून प्रणालीला पोषक कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यासह विदर्भात पावसाची शक्यता आहे. चार दिवसांपासून विदर्भात ढगाळ वातावरण निर्मिती होत आहे; परंतु पश्‍चिम विदर्भात तापमानाचा पारा ३३ ते ३४ डिग्री सेल्सिअसने वाढल्याने उकाडा वाढला असून, पाण्याचा ताण पडल्याने पिकांनी माना टाकणे सुरू केले आहे. दरम्यान, २७ ऑगस्ट रोजी कोकण, गोवा व विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस येण्याची शक्यता आहे. मुंबई व आसपासच्या परिसरात २९ ऑगस्ट रोजी पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. पुणे व आसपासच्या परिसरात २९ ते २ सप्टेंबरपर्यंत पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. दरम्यान, २९ ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असून, ३0 ऑगस्ट रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: Rainfall in 48 hours!