शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
7
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
8
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
9
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
10
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
11
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
12
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
13
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
14
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
15
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
16
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
17
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
18
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
19
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
Daily Top 2Weekly Top 5

‘अवकाळी’चा तडाखा: मागणी २९७ कोटींची; मिळाले ७२ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 12:29 IST

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत २९७ कोटी ९४ लाख ३० हजार रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असली तरी; मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला.पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात खरीप पिकांसह बागायती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांसाठी गत १६ नोव्हेंबर रोजी मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शेतकºयांना देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी २९७ कोटी ९४ लाख ३० हजार रुपये मदत निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांना मदत व सवलती देण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला असून, मदतनिधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी शासनामार्फत १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध मदत निधी जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.मदतीची २५ टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यात होणार जमा!जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ टक्के म्हणजेच ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला आहे. उपलब्ध मदत निधी १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील बाधित शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची २५ टक्के रक्कम जमा करण्यात येणार आहे.शेतकºयांच्या याद्या तयार करा; जिल्हाधिकाºयांचे निर्देश!मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात बाधित शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची २५ टक्के रक्कम जमा करण्यासाठी बँकनिहाय शेतकºयांच्या याद्या तयार करून, यादीनुसार मदतीच्या रकमेचे देयक कोषागार कार्यालयात जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार व उपविभागीय अधिकाºयांना १९ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे दिले.अवकाळी पावसाने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. मदत निधी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला असून, बाधित शेतकºयांना २५ टक्केप्रमाणे मदतीची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत.-संजय खडसे,निवासी उपजिल्हाधिकारी.

टॅग्स :FarmerशेतकरीAkolaअकोला