‘अवकाळी’चा तडाखा: मागणी २९७ कोटींची; मिळाले ७२ कोटी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 12:29 PM2019-11-20T12:29:39+5:302019-11-20T12:29:49+5:30

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला.

Rain strikes: Demand of Rs 297 crore Got 72 crore! | ‘अवकाळी’चा तडाखा: मागणी २९७ कोटींची; मिळाले ७२ कोटी!

‘अवकाळी’चा तडाखा: मागणी २९७ कोटींची; मिळाले ७२ कोटी!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ९ हजार ३४१ शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत २९७ कोटी ९४ लाख ३० हजार रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली असली तरी; मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदतनिधी शासनामार्फत मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला.
पावसाळा संपल्यानंतर गत महिनाभराच्या कालावधीत अवकाळी पावसाच्या तडाख्यात खरीप पिकांसह बागायती व फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये ३ लाख ९ हजार ३४१ शेतकºयांचे ३ लाख ६९ हजार ७१९ हेक्टर २५ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामध्ये जिरायत, बागायत आणि फळपिकांच्या नुकसानाचा समावेश आहे. अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांसाठी गत १६ नोव्हेंबर रोजी मदत जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत खरीप पिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी ८ हजार रुपये आणि फळपिकांच्या नुकसान भरपाईसाठी हेक्टरी १८ हजार रुपयांची मदत शेतकºयांना देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी २९७ कोटी ९४ लाख ३० हजार रुपये मदत निधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकºयांना मदत व सवलती देण्याचा निर्णय १८ नोव्हेंबर रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत घेण्यात आला असून, मदतनिधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार शेतकºयांना मदत वाटप करण्याच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील शेतकºयांसाठी ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी शासनामार्फत १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध मदत निधी जिल्ह्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

मदतीची २५ टक्के रक्कम शेतकºयांच्या खात्यात होणार जमा!

जिल्ह्यातील शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात २५ टक्के म्हणजेच ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी प्राप्त झाला आहे. उपलब्ध मदत निधी १९ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील बाधित शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची २५ टक्के रक्कम जमा करण्यात येणार आहे.

शेतकºयांच्या याद्या तयार करा; जिल्हाधिकाºयांचे निर्देश!
मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात बाधित शेतकºयांच्या बँक खात्यात मदतीची २५ टक्के रक्कम जमा करण्यासाठी बँकनिहाय शेतकºयांच्या याद्या तयार करून, यादीनुसार मदतीच्या रकमेचे देयक कोषागार कार्यालयात जमा करण्याची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील सातही तहसीलदार व उपविभागीय अधिकाºयांना १९ नोव्हेंबर रोजी पत्राद्वारे दिले.


अवकाळी पावसाने जिल्ह्यात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ७२ कोटी ५५ लाख ७७ हजार रुपयांचा मदत निधी शासनाकडून प्राप्त झाला आहे. मदत निधी जिल्ह्यातील तहसील कार्यालयांना वितरित करण्यात आला असून, बाधित शेतकºयांना २५ टक्केप्रमाणे मदतीची रक्कम वाटप करण्यात येणार आहे. मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी शेतकºयांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश जिल्ह्यातील तहसीलदारांना देण्यात आले आहेत.
-संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी.

Web Title: Rain strikes: Demand of Rs 297 crore Got 72 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.