शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

जीव मुठीत धरून ओलांडतात रेल्वेचा पूल

By admin | Updated: September 3, 2014 22:41 IST

शेगाव तालुक्यातील एकफळ आणि कुरखेड या गावात रस्ते नसल्याने नागरिक त्रस्त; विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार.

फहीम देशमुख / शेगावरस्ता दुरूस्तीच्या मागणीसाठी शेगाव तालुक्यातील एकफळ आणि कुरखेडच्या ग्रामस्थांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असून, गावांमध्ये निवडणूक प्रचारावर बंदीही घातली आहे. रस्त्यांअभावी दोन्ही गावाच्या विद्यार्थ्यांची शाळा बंद असून, शाळेत जायचेच म्हटले तर, त्यांना रेल्वे पूल ओलांडावा लागतो. पूल ओलांडताना एखादी दुर्घटना घडली, तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.शेगाव तालुक्यातील कुरखेड आणि एकफळ या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी रस्त्याच्या मागणीसाठी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच गावात प्रचारबंदीही घातली आहे. दोन्ही गावाचे सरपंच, उपसरपंच आणि नागरिकांनी त्यांचा हा निर्णय बुलडाण्याचे जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर यांना रितसर कळविला आहे. या पृष्ठभूमिवर या दोन्ही गावाच्या परिस्थितीची पाहणी ह्यलोकमतह्ण चमूने केली. केवळ २५0 लोकसंख्या असलेले एकफळ हे गाव शेगावपासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. अंतर कमी असले तरी, येथील ग्रामस्थांना शेगावात पोहोचण्यासाठी किमान दोन तास लागतात. ग्रामस्थांना अळसणा मार्गे शेगावला जावे लागते; मात्र अळसणा गावापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ताच नाही. तीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम मंजूर झाले असून, काही जमिनींच्या दानपत्रामुळे हे काम अडक ले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना रेल्वे पुलाला लागून असलेल्या बिकट रस्त्याने अळसणापर्यंत पायी जावे लागते. पावसाळय़ात या रस्त्यावर कंबरेएवढे पाणी साचते आणि आहे तो रस्ताही बंद होतो. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनाही जीव धोक्यात घालून रेल्वे रुळावरून जावे लागते.* येथील नागरिकांना ३00 मिटरचा रेल्वे पुल ओलांडतांना साक्षात देव आठवतो कारण पुलावरुन जात असतांना समोरुन किंवा मागुन रेल्वे गाडी आली तर पुलावरुन खाली उडी मारणे किंवा रेल्वे खाली येणे या शिवाय कुठलाही पर्याय त्यांच्या समोर नसतो. * दिवसा पुर्वी एका महिलेला प्रसुतीसाठी बैलगाडीत टाकुन शेगावला आणत असतांना संपुर्ण गावकर्‍यांना तारेवरची कसरत करावी लागली. यापुर्वीही रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचविण्यासाठी खांद्यावर बसवुन रुग्णालया पर्यंत न्यावे लागले. *रस्त्याअभावी शिक्षणाची स्थितीही गंभीर आहे. पाऊस आला की, त्यादिवशी शाळेला दांडी मारण्याशिवाय पर्याय नसतो. कारण विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही. या गावात रुग्णालय नाही, शाळा आहे ती चवथीपर्यंतच, अंतर्गत रस्ते नाहीत आणि नाल्याही नाहीत.