शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: नव्या वक्फ कायद्यातील दोन तरतुदींना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; सरकारकडून मागितलं उत्तर
2
महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदीच्या सक्तीवरून राज ठाकरे आक्रमक, म्हणाले. "आज भाषा सक्ती करत आहेत, उद्या…’’, 
3
ऑटोमॅटीक कार चालवत असाल तर लक्ष द्या; रक्ताच्या गुठळ्या, कार्डियाक अरेस्टचा धोका
4
"मी लग्न करेन, पण एका अटीवर..."; सासूसोबत पळून गेलेला जावई काय म्हणाला?
5
"३ महिन्यात निर्णय घ्या"; कोर्टाच्या निर्णयावर उपराष्ट्रपती नाराज, म्हणाले, "न्यायालय आदेश देऊ शकत नाही"
6
माझा आजचा दौरा जड अंतःकरणाने रद्द करावा लागतो आहे; कारण सांगत धनंजय मुंडेंनी दिली माहिती
7
हिंदी सक्तीवरून मनसे आक्रमक, आंदोलनाचा इशारा; नेते म्हणाले, “आमच्यावर भाषा लादू शकत नाही”
8
पंचांशी वाद घातल्याबद्दल मुनाफ पटेलला बीसीसीआयने ठोठावला दंड, दिल्ली- राजस्थान सामन्यात काय घडलंं?
9
२०३२ पर्यंत गुरुची अतिचारी गती: ९ राशींना गुरुबळ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; बक्कळ लाभ, भरभराट!
10
चीनच्या कंपनीने मारुतीच्या फ्राँक्सची कॉपी केली; 1200 किमी रेंजवाली एसयुव्ही लाँच केली
11
२०० रुपयांपर्यंतचे Jio, Airtel आणि Vi चे प्लान्स, मिळताहेत जबरदस्त बेनिफिट्स
12
"तुम मराठी लोग गंदा है...", घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी-गुजराती वाद, मनसैनिकांनी काय केलं पाहा...
13
सोन्याच्या दरात मोठी तेजी, पोहोचलं १ लाखांच्या जवळ, किंमत कमी होण्याची शक्यता आहे का? पाहा नवे दर
14
लोणावळा रेल्वे रुळाजवळ सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह आढळला; परिसरात खळबळ!
15
IPL 2025: २५ दिवसांपूर्वी केलेली भविष्यवाणी आज काव्या मारनला हसवणार की रडवणार? प्रकरण काय
16
"एकनाथ शिंदेंच्या घरात शूटिंग केलं तेव्हा.."; क्षितीश दातेने सांगितला 'धर्मवीर'चा अनुभव
17
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा कुबेर महाराजांची तसबीर आणि 'या' पाच भाग्यदायी वस्तू!
18
"स्क्रीनवर चांगली दिसण्यासाठी ती...", श्रीदेवीच्या मृत्यूबाबतीत बोनी कपूर यांचा धक्कादायक खुलासा
19
Dia Mirza : "तो सीन करताना मी थरथरत होती, मला उलटी झाली"; दीया मिर्झाने सांगितला शुटिंगचा अनुभव
20
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले दीड कोटी! आता बोनस शेअर्स आणि लाभांशाची लागणार लॉटरी

रब्बीचा हंगाम एक महिना पुढे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 15:38 IST

गहू, हरभरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अकोला: यावर्षी पावसाळा लांबल्याने रब्बी पिके पेरणीचा हंगाम एक महिना पुढे गेला असून,आणखी पेरणी सुरू आहे. गहू, हरभरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.परतीच्या पावसानेही बऱ्यापैकी हजेरी लावल्याने यावर्षी सरासरी गाठली आहे. जिल्ह्यातील सर्वच सिंचन प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध असल्याने रब्बीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, शेतकऱ्यांनीदेखील मूग, उडीद काढणी केलेल्या गहू पिकाचे नियोजन केले आहे. तद्वतच खारपाणपट्ट्यातील शेतकºयांनी रब्बी ज्वारीची पेरणीचे नियोजन केले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यासाठीचे मार्गदर्शन करीत आहेत. सिंचनाच्या सुविधेमुळे गव्हाचे क्षेत्र बºयापैकी वाढण्याची शक्यता आहे; परंतु परतीचा पाऊस लांबल्याने खरीप पिके काढण्यास विलंब झाला आहे. डिसेंबर महिन्यातही खरीप ज्वारी कापणीची कामे सुरू असून, सोयाबीन व इतर पिके काढलेल्या शेतावर मशागतीची कामे सुरू आहेत. शेती तयार करण्यासाठी यंत्राचा वापर करण्यात येत असून, रोटाव्हेटरला सर्वाधिक मागणी आहे. अतिपावसामुळे शेतात डोक्याच्यावर तण वाढले आहे. हे तण काढण्यासाठी अनेक शेतकºयांनी हार्वेस्टरचाही वापर केला आहे.हरभरा पेरणी सर्वसाधारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आाठवड्यापर्यंत तर गहू पिकाची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येते; परंतु यावर्षी ऋतूचक्र बदलले असून, जमीन ओली आहे. म्हणूनच या दोन्ही पिकांची पेरणी १५ डिसेंबरपर्यंत करता येईल अशी शिफारस केली असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. गहू पेरणी १५ जानेवारपर्यंत होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे.

- सिंचनाला पाणी उपलब्धकाटेपूर्णा, वाण, मोर्णा, निर्गुणा, उमा सर्वच धरणात मुबलक पाणी उपलब्ध असल्याने या धरणांच्या क्षेत्रात येणाºया रब्बी पिकांना पाणी मिळणार आहे. म्हणूनच गव्हाची पेरणी १५ जानेवारीपर्यंत होण्याची शक्यता आहे. काही भागात कोरडवाहू क्षेत्रावरही शेतकºयांनी गहू पेरणी केली आहे.

- अकोला तालुक्यात पेरणीला उशीरअकोला तालुक्यात पेरणी आता पेरणी केली जात असून, शेतकºयांनी हरभरा पेरणीवर भर दिला आहे. बोंदरखेड, यावलखडे, सांगळूद, पांढरी आदी गावांच्या क्षेत्रात पेरणी सुरू आहे.

- पावसाळा लांबल्याने रब्बी पेरणीचा हंगाम एक महिना पुढे ढकलला आहे. गहू, हरभरा पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत केली जाते. यावर्षी पावसाळा लांबल्याने ही दोन्ही पिकांची १५ डिसेंबरपर्यंत पेरणी करता येईल, अशी शिफारस करण्यात आली आहे. तथापि, उशिरा पेरणी करण्यात येणाºया शेतकºयांकडे सिंचन व्यवस्था असली तर उत्तमच.डॉ.एन.आर. पोटदुखे,विभागप्रमुख,कडधान्य विभाग,डॉ. पंजबाराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी