शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

जनसुविधा-तीर्थक्षेत्र विकास कामांचा मार्ग मोकळा

By admin | Updated: January 8, 2015 00:56 IST

अकोला जिल्ह्यातील साडेसहा कोटींच्या २0१ कामांना अखेर प्रशासकीय मान्यता.

संतोष येलकर/अकोला:जिल्ह्यात जनसुविधा आणि तीर्थक्षेत्र विकासासाठी ६ कोटी ६२ लाखांच्या २0१ विकास कामांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून (सीईओ) प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासकीय मान्यतेअभावी अडकलेल्या जिल्ह्यातील जनसुविधा आणि तीर्थक्षेत्र विकास कामांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या जनसुविधा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील स्मशानभूमी विकास तसेच सिमेंट काँक्रीट रस्ता व स्मशानभूमी शेड उभारण्याची कामे आणि तीर्थक्षेत्र विकासाची कामे गतवर्षी जिल्हा परिषदमार्फत प्रस्तावित करण्यात आली होती. त्यामध्ये जिल्ह्यातल्या सातही तालुक्यातील लहान ग्रामपंचायतीमार्फत जनसुविधा अंतर्गत १३३ आणि मोठय़ा ग्रामपंचायतीमार्फत ४७, अशा एकूण १८0 स्मशानभूमी विकासाच्या कामांना आणि २१ तीर्थक्षेत्र विकासाच्या कामांना गत २७ जून २0१४ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत मंजुरी देण्यात आली होती. जनसुविधा व तीर्थक्षेत्र विकासाच्या एकूण २0१ विकासाच्या कामांसाठी ६ कोटी ६२ लाखांच्या निधीलादेखील ह्यडीपीसीह्णमार्फत मंजुरी देण्यात आली होती. या सर्व विकास कामांसाठी गत मार्च महिन्यातच जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागामार्फत जिल्हा परिषदेला निधीही उपलब्ध झाला होता. मात्र लोकसभा, विधान परिषद आणि त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकांच्या कालावधीत जिल्ह्यातील या विकास कामांना प्रशासकीय मान्यता देण्याची प्रक्रिया रखडली.जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे कार्यवृत्त जिल्हा नियोजन अधिकार्‍यामार्फत ३१ डिसेंबर २0१४ रोजी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यानंतर जनसुविधा आणि तीर्थक्षेत्र विकासाच्या या कामांना मान्यता देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी २ जानेवारी २0१५ रोजी काढला. प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या विकास कामांमध्ये लहान ग्रामपंचायतींमार्फत करावयाच्या १३३ आणि मोठय़ा ग्रामपंचायतींमार्फत करावयाच्या ४७ जनसुविधांची कामे आणि २१ तीर्थक्षेत्र विकास कामांचा समावेश आहे. प्रशासकीय मान्यतेअभावी गेल्या महिन्यापासून रखडलेल्या या कामांना अखेर प्रशासकीय मान्यता मिळाल्याने ६ कोटी ६२ लाखांच्या जिल्ह्यातील २0१ विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. जनसुविधा व तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील विकास कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या कामांचा मंजूर निधी लवकरच जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर बीडीओंकडे पाठविण्यात येईल व कामे मार्गी लागणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण उन्हाळे यांनी स्पष्ट केले.