सरकारी वकील पदासाठी विधिज्ञांमध्ये चढाओढ

By Admin | Updated: May 26, 2015 02:31 IST2015-05-26T02:31:35+5:302015-05-26T02:31:35+5:30

शनिवारी होणार मुलाखती

Public prosecutor bureaucrats bout | सरकारी वकील पदासाठी विधिज्ञांमध्ये चढाओढ

सरकारी वकील पदासाठी विधिज्ञांमध्ये चढाओढ

अकोला: न्यायालयातील जिल्हा सरकारी वकील सुभाष काटे यांचा कार्यकाळ संपल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी न्यायालयातील विधिज्ञांमध्ये चढाओढ सुरू आहे. जिल्हा सरकारी वकील पदासाठी ३0 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखती होणार आहेत. रिक्त झालेले जिल्हा सरकारी वकील आणि साहाय्यक सरकारी वकील पदासाठी २८ ते ३0 मेपर्यंंत मुलाखती घेण्याचा कार्यक्रम ठरविण्यात आला. प्रतिष्ठेचे जिल्हा सरकारी वकिलाचे पद प्राप्त करण्यासाठी न्यायालयातील वकिलांमध्ये चांगलीच चढाओढ सुरू आहे. या पदासाठी एकूण १५ अर्ज प्राप्त झाले आहेत, तर साहाय्यक सरकारी वकील पदासाठी ६0 अर्ज प्राप्त झाले आहेत. २८ व २९ मे रोजी साहाय्क सरकारी वकील पदासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मुलाखती होणार आहेत. जिल्हा सरकारी वकील पदासाठी ३0 मे रोजी मुलाखती होतील. मुलाखती घेण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता सुनील मनोहर यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. जिल्हा सरकारी वकिलाचे पद हे मानाचे व प्रतिष्ठेचे मानले जाते. या पदासाठी अनेक विधिज्ञ इच्छुक आहेत. यामध्ये साहाय्यक सरकारी वकील विनोद फाटे, अँड. राजेश्‍वर रमेश देशपांडे, अँड. प्रवीण चिंचोले, अँड. श्याम खोटरे, अँड. प्रवीण कडाळे, श्रीपाद गांधी यांच्यासह आणखी नऊ विधिज्ञांचा समावेश आहे.

Web Title: Public prosecutor bureaucrats bout