शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
4
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
5
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
6
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
7
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
8
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
9
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
10
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
11
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
12
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
13
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
14
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
15
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
16
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
17
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
18
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
19
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
20
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांना चांगल्या सेवा द्या- आठवले

By admin | Updated: February 19, 2015 00:19 IST

बुलडाणा येथे कास्ट्राइब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे आठवे द्विवार्षिक अधिवेशन.

बुलडाणा : जनसामान्याची अहोरात्र सेवा करणारे एस.टी.महामंडळ नेहमीच तोट्यात असते, आता तर महामंडळचे अस्तीत्वच धोक्यात आल्याची भिती व्यक्त केल्या जात आहे. एस.टी.ला धोका नाही असे सरकार कितीही सांगत असले तरी आपण काळाची पावले ओळखली पाहिजे. नोकर्‍या टीकवायच्या असतील तर प्रवाशांना चांगली सेवा द्या. एस.टी.वाचली तरच नोकर्‍या वाचतील असा सल्ला खा. रामदास आठवले यांनी दिला. कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे ८ वे द्वीवार्षीक अधिवेशन बुलडाणा येथे १८ फेब्रुवारी रोजी पार पडले. यावेळी उद्घाटनपर भाषणात खा. आठवले बोलत होते. स्वगताध्यक्ष म्हणून राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सनदी अधिकारी उत्तमराव खोब्रागडे, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. अशोक उईके, जि.प.चे माजी सभापती दिलीप जाधव, सुनिल निरभवणे, संस्थापक अध्यक्ष पी.टी.खंडारे, एच.बी.तायडे, नरहरी गवई, अरविंद जगताप, व्ही.के.रामटेके, दादाराव गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी ह्यएस.टी.चे अस्तीत्व संपुष्टात आनणारे रस्ते वाहतुक सुरक्षा विधेयक २0१४ मधील जाचक कलम रद्द कराह्ण असा ठराव पारीत करून एस.टी.बचाव अभियाणाला सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविक भाषणात निमंत्रक सुनिल निरभवणे यांनी संघटनेची भुमिका मांडली. ते म्हणाले की, प्रस्तावित रस्ते वाहतुक २0१४ विधेयकाती १४५, ४७ आणि १४८ या कलमान्वये टप्पा वाहतुक देण्याचा अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थेला राहणार आहे.टेंडर पध्दतीने रस्ते विकल्या जातील, अर्थतातच नफ्याचे मार्ग एस.टी.ला मिळणार नाही त्यामुळे एसटीचे अस्तीत्व संपुष्टात येईल पर्यायाने कर्मचार्‍यांच्या नोकर्‍या धोक्यात येतील त्यामुळे हे विधेयक संसदेत संमत होणार नाही त्यासाठी जनजागृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी सामाजिक, राजकिय क्षेत्रात कार्य करणार्‍या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. तर स्वागताध्यक्ष बाबासाहेब जाधव यांचा सपत्नीक रामदास आठवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन रमेश आराख, सुरेश साबळे यांनी केले.अधिवेशनाला राज्यभरातून कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.