शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाने केली चोरीच्या सोन्याची खरेदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2019 10:59 AM

सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू वर्मा यानेच चोरीतील सोने खरेदी केल्याचे खळबळजनक वास्तव तपासात उघडकीस आले आहे.

ठळक मुद्देअकोला सराफा बाजार चोरीचे सोने खरेदी करणारे राज्यातील मोठे केंद्रच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. वर्मा याने सोने खरेदी केल्याची कबुलीच पोलिसांसमोर देऊन ९० ग्रॅम सोने पोलिसांच्या स्वाधीन केले.

- सचिन राऊत लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या तीन मोठ्या चोरीतील दोन चोरट्यांना अटक केल्यानंतर त्यांनी दिलेल्या माहितीवरून अकोला सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू वर्मा यानेच चोरीतील सोने खरेदी केल्याचे खळबळजनक वास्तव तपासात उघडकीस आले आहे. वर्मा याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांवरच आगपाखड करीत ठाणेदाराचीच पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्याचा आटापिटा करण्यात आला; मात्र पोलिसांचा दंडुका बसताच त्याने चोरीतील सोने खरेदी केल्याची कबुली देऊन खरेदी केलेले ९० ग्रॅम सोने पोलिसांना परत केले. यावरून अकोला सराफा बाजार चोरीचे सोने खरेदी करणारे राज्यातील मोठे केंद्रच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.नगर परिषद कॉलनीतील रहिवासी प्रशांत डंबेलकर, शैलेश अक्षय मिश्रा तसेच सिंधी कॅम्प परिसरातील पक्की खोली येथील रहिवासी परळीकर या तीन घरफोड्यात तब्बल १० लाख रुपयांचा मुद्देमाल पळविण्यात आला आहे. या चोरीचा तपास करताना खदानचे ठाणेदार उत्तमराव जाधव यांनी सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी नदीम बेग कलीम बेग आणि अ. रिजवान अब्दुल खालीद या दोन चोरट्यांना अटक केली. दोन्ही चोरटे १ डिसेंबरपासून पोलिसांच्या ताब्यात असून, त्यांनी आतापर्यंत या तीनही चोऱ्यांची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या चोºयातील रोख १लाख रुपये, एक दुचाकी व १२ हजार रुपयांची चांदी जप्त केली आहे. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत डंबेलकर यांच्या निवासस्थानी केलेल्या चोरीतील ९० ग्रॅम सोने या चोरट्यांनी सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू ऊर्फ राजकुमार वर्मा याला विकल्याची माहिती दिली. यावरून पोलिसांनी वर्मा याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली; मात्र वर्मा याने टाळाटाळ सुरू करीत पोलिसांवरच आरोप करण्याचा प्रयत्न केला; मात्र चोरीचे सोने खरेदी केल्याचे पुरावेच पोलिसांनी त्याच्यासमोर ठेवल्यानंतर वर्मा याने सोने खरेदी केल्याची कबुलीच पोलिसांसमोर देऊन ९० ग्रॅम सोने पोलिसांच्या स्वाधीन केले. हे सोने डंबेलकर यांच्या घरातील असून, त्यांना लवकरच परत करण्यात येणार असल्याची माहिती आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केली उलट चौकशीखदान पोलिसांनी सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू वर्मा याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून ९० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले; मात्र याच वेळी खदान पोलिसांवर विविध आरोप केल्याने या प्रकरणाची चौकशी शहर पोलीस उपअधीक्षक यांनी केली. त्यांच्या चौकशीतही चोरीचे सोने सराफा असोसिएशनचा अध्यक्ष राजू वर्मा याने खरेदी केल्याचे उघड झाले. त्यामुळे ही असोसिएशन तोंडघशी पडल्याचे दिसून आले.

पोलीस अधीक्षकांकडे शिष्टमंडळ नेण्याचा डावपिवळ्या सोन्याचा व्हाइट कॉलर काळा धंदे करणाºया अकोल्यातील सराफांवर आतापर्यंत बहुतांश वेळा चोरीच्या सोने खरेदी-विक्री केल्यानंतर कारवाई करण्यात आलेली आहे; मात्र ह्यचोर ते चोर वरून शिरजोरह्ण अशी म्हण प्रत्यक्षात आणण्यासाठी हेच सराफा संबंधित पोलीस अधिकाºयावर आरोप करून त्यांच्याविरुद्ध पोलीस अधीक्षकांकडेच शिष्टमंडळ घेऊन जाण्याचा डाव आखतात. या प्रकरणातही सराफा असोसिएशनच्या अध्यक्षाला ताब्यात घेताच अकोल्यातील सराफांनी दबावतंत्र निर्माण केले; मात्र पोलिसांनी भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे या चोरीतील तब्बल ९० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात यश आले.कोकणातील चोरटा आला होता अकोल्यात४कोकणातील रायगड जिल्हयात घरफोड्या केल्यानंतर सदरच्या चोरीतील सोने विक्री करण्यासाठी कोकणातील एक चोरटा ६ महिन्यांपूर्वी अकोल्यातील गांधी रोडवर आला होता. या चोरट्याने गांधी रोडवरील मंदिरानजीक असलेल्या एका सराफाकडे चोरीचे सोने विक्री करण्यासाठी व्यवहार केला होता; मात्र नेमके याच वेळी स्थानिक गुन्हे शाखेने चोरट्यास अटक केल्याने व्यवहार अर्धवट राहिला. त्यानंतर अद्यापही त्या सराफावर कारवाई झालेली नाही. हा सराफाही चोरीचे सोने खरेदी करण्यात पटाईत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.पोलिसांना माफी मागण्यासाठी आटापिटा चोरीचे सोने खरेदी केल्याप्रकरणी राजू वर्मा याला ताब्यात घेताच त्याच्यासह सराफा असोसिएशनने आधी पोलिसांसोबत मुजोरी करण्याचा प्रयत्न केला. पोलीस चौकशीत वास्तव उघड होताच खदान पोलिसांसह वरिष्ठ पोलिसांना माफी मागण्याचा आटापिटा या असोसिएशनच्यावतीने करण्यात आला. केवळ एका चोरीतील ९० ग्रॅम सोने असोसिएशनच्या अध्यक्षनेच खरेदी केल्याचे उघड झाल्यानंतर अशा अनेक चोºयातील सोने खरेदी करणाºया सराफांचेही आता बिंग फुटण्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांसमोर लोटांगण घातल्याची माहिती आहे.

चोरट्यांनी दिलेल्या माहितीनुसार सराफा राजू वर्मा याला ताब्यात घेतले आहे. चोरीच्या सोने खरेदीसंदर्भात चौकशी केली.सुरुवातीला टाळाटाळ केल्यानंतर दोन चोरट्यांकडून ९0 ग्रॅम सोने खरेदी केल्याची कबूली त्याने दिली. त्याच्याकडून ते सोने जप्त करण्यात आले.- उत्तमराव जाधव, ठाणेदार खदान पोलीस स्टेशन

 

टॅग्स :AkolaअकोलाGoldसोनंCrime Newsगुन्हेगारी