बदली झालेल्या १८ शिक्षकांना रुजू करण्याची तयारी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 11:01 IST2020-08-30T11:00:55+5:302020-08-30T11:01:14+5:30
त्यामध्ये मराठी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे.

बदली झालेल्या १८ शिक्षकांना रुजू करण्याची तयारी!
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात बदली झालेल्या १८ प्राथमिक शिक्षकांना रुजू करून घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये मराठी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे.
शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत आॅनलाइन पद्धतीने गत महिन्यात राबविण्यात आलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेत अकोला जिल्हा परिषद अंतर्गत २१ प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली करण्यात आली असून, त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १९ व उर्दू माध्यमाच्या २ शिक्षकांचा समावेश आहे. तसेच आंतरजिल्हा बदलीने वेगवेगळ्या जिल्ह्यांतून मराठी माध्यमाचे १४ व उर्दू माध्यमाचे १४ अशा २८ शिक्षकांची अकोला जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
आंतरजिल्हा बदली करण्यात आलेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करून घेण्यासह बदलीच्या ठिकाणी रुजू करून घेण्याचा आदेश शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत २५ आॅगस्ट रोजी राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्ह्यातून आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद प्रशासनामाफृत सुरू करण्यात आली आहे.
तसेच आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येत असलेल्या २८ शिक्षकांपैकी १८ शिक्षकांना रिक्तपदांवर रुजू करून घेण्याची तयारी जिल्हा परिषद प्रशासनामार्फ त सुरू करण्यात आली आहे.