अकोला शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; कांदा विक्रेत्याचे मोठे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 19:24 IST2025-05-18T19:24:12+5:302025-05-18T19:24:52+5:30
Akola News: अकोला शहरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसात जठारपेठ परिसरात कांदा विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाचा कांदा पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले.

अकोला शहरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; कांदा विक्रेत्याचे मोठे नुकसान
अकोला : अकोला शहरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसात जठारपेठ परिसरात कांदा विक्रीसाठी आलेल्या व्यावसायिकाचा कांदा पाण्यात वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले.
नीलेश भिलारे हे जठारपेठ परिसरात कांदा, बटाटा व लसूण विक्रीसाठी आले होते. मात्र, अचानक झालेल्या पावसामुळे त्यांच्या सगळ्या मालाला पाणी लागले. रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे त्यांनी खाली ठेवलेला माल पूर्णपणे भिजला. यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.