शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
3
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
4
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर
5
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
6
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
7
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
8
Ananya Birla : आता वडिलांचा व्यवसाय सांभाळण्याची तयारी, संगीतातून ब्रेक; अनन्या बिर्लाची भावूक पोस्ट
9
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
10
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
11
महाराष्ट्राच्या दादा-वहिनींनी केलं मतदान; केंद्राबाहेर आल्यावर रितेश म्हणाला...
12
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
13
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
14
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
15
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
16
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
17
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
18
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
19
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
20
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...

दिव्यांगांना दिले बळ अन् दिशा: आर्ट गॅलरीच्या अभिनव प्रयोग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 4:31 PM

अकोला: अंध, अपंग, पंगू म्हणून समाजाने हेटाळणी केलेल्या दिव्यांगांना स्वबळावर हिमतीने उभे राहण्याचे बळ आणि रोजगार मिळवून जगण्याची नवी दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य अकोल्यात टीम करीत आहे.

- संजय खांडेकरअकोला: अंध, अपंग, पंगू म्हणून समाजाने हेटाळणी केलेल्या दिव्यांगांना स्वबळावर हिमतीने उभे राहण्याचे बळ आणि रोजगार मिळवून जगण्याची नवी दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य अकोल्यात टीम करीत आहे. दिव्यांगांच्या एकूणच सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या अकोल्यातील आर्ट गॅलरीने एक नवे अनेक विविध अभिनव असे प्रयोग सुरू केले आहे. या प्रयोगाची दखल राज्यभरात घेतली जात असून, अकोल्यातील दिव्यांग आर्ट गॅलरी दिव्यांगांसाठी आयकॉन ठरत आहे.दृष्टिहीन असलेले डॉ. विशाल कोरडे स्थानिक श्री शिवाजी महाविद्यालयातील संगीत विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवारत आहेत. संगीताचे धडे देताना आणि स्वत: गिरविताना प्रा. कोरडे यांना अनेक समस्या आल्यात. दिव्यांगांच्या समस्या अनंत असून, त्यांच्यासाठी रोजगाराचे आणि शिक्षणाचे नवे दालन खुले करण्याची गरज असल्याचे त्यांना जाणवले आणि सुरू झाला दिव्यांग आर्ट गॅलरीचा प्रवास. दिव्यांग आर्ट गॅलरीने सर्वप्रथम अकोल्यातील दिव्यांगांची नोंद सुरू केली. ही नोंदणी सुरू असताना अनेकांच्या सुप्त संकल्पना समोर आल्यात. रक्षाबंधनाच्या निमित्ताने कार्यशाळा बोलाविण्यात आली. अकोल्यातील शेकडो दिव्यांगांनी विविध रंग, आकार आणि प्रकारच्या राख्या तयार केल्यात. त्यांचे प्रदर्शन शहरात भरविण्यात आले. त्यातून अनेकांना रोजगारदेखील मिळाला. त्यानंतर अकोला आर्ट गॅलरीने विविध हस्तकला निर्मिती, प्रदर्शन आणि विक्रीचे आयोजन केले. त्यालादेखील चांगला प्रतिसाद लाभला. दिव्यांगांची नोंदणी वाढविण्याची यूडी आयडी वितरणाची कार्यशाळा घेतली गेली. ब्रेललिपी लायब्ररीचे गठन करण्यात आले. दिव्यांगांना दृष्टी नसली तरी त्यांना भाषा व जाणिवेतून सृष्टी साकारता येते. म्हणून डॉ. कोरडे यांच्या नेतृत्वात काटेपूर्णा भ्रमंतीचा प्रयोग केला गेला. ल्युइसब्रेलसाठी वाचक आणि लेखणी बँक तयार करण्याची मागणी पुढे आली. दिव्यांग आर्ट गॅलरीच्या माध्यमातून दीडशे स्वयंसेवक पुढे आलेत. दिव्यांगांना रोजगार मिळवून देण्यासाठी सातत्याने विविध प्रयोग राबविले जात असून, दिव्यांगांना आता आॅनलाइन कार्यपद्धतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. यापुढे फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि इतर मार्गदर्शन शिबिर घेतले जात आहे. दिव्यांग आर्ट गॅलरीने अकोल्यात राबविलेल्या विविध अभिनव प्रयोगांची दखल राज्यात घेतली गेली असून, आता राज्यात दिव्यांग आर्ट गॅलरी ठिकठिकाणी स्थापन होत आहे.निसर्गाने पंगू म्हणून जन्माला घातले असले तरी आम्ही इतर डोळस आणि सुदृढांपेक्षाही सरस असे कार्य करू शकतो. दिव्यांग आर्ट गॅलरीची टीम झपाटल्यागत एकमेकांना सावरून दिव्यांगांना स्वयंरोजगाराचे बळ आणि नव्या दिशा देण्याचे कार्य करीत आहे. खालील ओळी जणू दिव्यांगांच्या जगण्याचे प्रतिनिधित्व करीत आहे... 

 

टॅग्स :AkolaअकोलाSocialसामाजिक