नाकाबंदी करुन गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

By आशीष गावंडे | Published: April 8, 2024 10:13 PM2024-04-08T22:13:17+5:302024-04-08T22:13:38+5:30

पाेलिसांनी तडीपारांना दाखवला खाक्या; शस्त्र केली जप्त

police caught accused in akola | नाकाबंदी करुन गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

नाकाबंदी करुन गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या

अकाेला: तडीपार केल्यानंतरही शहरात वावरणाऱ्या चार जणांच्या मुसक्या आवळत नाकाबंदीदरम्यान अनेकांवर कारवाइचा दंडुका उगारण्यात आला. ही कारवाइ रविवारी जिल्हाभरात अमावस्या नाकाबंदी दरम्यान पाेलिसांकडून करण्यात आली.

लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलिस यंत्रणा सतर्क झाली असून गुन्हेगारांना वठणीवर आणन्यासाठी कारवाया केल्या जात आहेत. या धर्तीवर अमावस्येच्या रात्री वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण पाेलिस यंत्रणा रस्त्यावर उतरली हाेती. नाकाबंदी दरम्यान जिल्हयात ५९० वाहनांची तपासणी केली असता ५७ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला.

‘एलसीबी’ने अकोटफैल हद्दीतील तडीपार अमोल गायकवाडसह आणखी एक जण, डाबकी रोड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील एक व उरळ पोलिस स्टेशन अंतर्गत येणारा एक यानुसार चार तडीपारांवर कलम १४२ मपोका प्रमाणे कारवाई करण्यात आली. पकड वॉरंट मधील आरोपी मंगेश तुळशीराम साटोटे, वय ३९ रा. कापशी याला अटक केली. पोलीस स्टेशन बार्शिटाकळी येथील क्रिकेट बेटींग मधील फरार आरोपी मोहित शर्मा याला ‘एलसीबी’ने ताब्यात घेतले.

हाॅटेल, लाॅजची घेतली झाडाझडती
पाेलिस यंत्रणेने १४२ समन्स, ४१ जमानती वॉरंट, ४२ पकड वॉरंट तामील केले. ९३ अभिलेखावरील निगराणी बदमाश व माहितीगार गुन्हेगारांची झडती घेत कलम १२२ मपोका प्रमाणे १७ कारवाया केल्या. भारतीय हत्यार कायद्यान्वये ८ केसेस करून ८ घातक शस्त्रे जप्त केली आहेत. तसेच जिल्हयातील ६१ हॉटेल, लॉजेसची झाडाझडती घेत ८३ एटीएमची तपासणी करण्यात आली. दारू बंदी कायद्यान्वये जिल्हयात १२ केसेस केल्याची माहिती आहे.

Web Title: police caught accused in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.