युवकाला मारहाण करून रोकड पळविली

By Admin | Updated: August 28, 2015 01:23 IST2015-08-28T01:03:51+5:302015-08-28T01:23:34+5:30

पक्षी विकणा-या युवकाला केली मारहाण

The police beat up the boy and beat him | युवकाला मारहाण करून रोकड पळविली

युवकाला मारहाण करून रोकड पळविली

अकोला: लरातो वाणिज्य महाविद्यालयासमोर पक्षी विक्रीचा व्यवसाय करणार्‍या युवकाला दोन गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी मारहाण करून त्याच्याकडील ४३ हजार रुपयांची रोकड हिसकावून घेतली आणि पसार झाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पक्षी विक्रीचा व्यवसाय करणारे प्रेमराज रामलाल तायडे (२६) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या दुकानावर सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास गुंड प्रवृत्तीचे शुभम सावंत आणि आकाश भालेराव हे दोन युवक आले. त्यांनी दुकानातील कर्मचार्‍यांना मारहाण करून गल्ल्यातील रोख १३ हजार रुपये काढून घेतले. दुकानातील कर्मचार्‍यांनी प्रेमराज तायडे यांना माहिती दिल्यावर ते दुकानात आले. त्यांनी दोन्ही युवकांना विचारणा केली असता, त्यांनी तायडे यांनाही मारहाण केली आणि त्यांच्या खिशातील ३0 हजार रुपये काढून घेतले आणि पळून गेले. यापूर्वीही दोन वेळा या युवकांनी त्यांच्याकडून पैसे हिसकावून नेले. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतरही दखल घेण्यात आली नाही, असा आरोपी त्यांनी केला. गुरुवारी त्यांनी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला आणि आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला.

Web Title: The police beat up the boy and beat him