पिंजर-सावरखेड फाटा रस्त्याचे काम निकृष्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:58 IST2021-01-08T04:58:29+5:302021-01-08T04:58:29+5:30

निवेदनात नमूद आहे की, गत दोन वर्षांपासून सावरखेड फाटा-निहिदा-बहिरखेड-पिंजर या ८ कि.मी. अंतर असलेल्या रस्त्याचे काम संथगतीने ...

Pinjar-Savarkhed fork road work inferior! | पिंजर-सावरखेड फाटा रस्त्याचे काम निकृष्ट !

पिंजर-सावरखेड फाटा रस्त्याचे काम निकृष्ट !

निवेदनात नमूद आहे की, गत दोन वर्षांपासून सावरखेड फाटा-निहिदा-बहिरखेड-पिंजर या ८ कि.मी. अंतर असलेल्या रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. रस्त्याच्या कामात माती मिश्रित गिट्टीचा वापर होत आहे. तसेच पिंजर येथील नदीवर पुलाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याने नागरिकांना नदीपात्रातून वाट काढावी लागत आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. याबाबत कंत्राटदाराशी संपर्क साधला असता उडवाउडवीचे उत्तर मिळत असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अनुराधा ठाकरे यांनी निवेदनातून दिला आहे.

Web Title: Pinjar-Savarkhed fork road work inferior!