लोकप्रतिनिधी, लोकांशी चर्चा करून कामाला प्राधान्य देणार!

By Admin | Updated: May 26, 2015 02:37 IST2015-05-26T02:37:10+5:302015-05-26T02:37:10+5:30

जी.श्रीकांत यांनी स्वीकारली जिल्हाधिकारी पदाची सूत्रे.

People's representatives will talk to people, give priority to the work! | लोकप्रतिनिधी, लोकांशी चर्चा करून कामाला प्राधान्य देणार!

लोकप्रतिनिधी, लोकांशी चर्चा करून कामाला प्राधान्य देणार!

अकोला: जिल्हय़ात दौरा करून, लोकप्रतिनिधी आणि लोकांशी चर्चा करून, विकासकामांना प्राधान्य देणार असल्याची ग्वाही अकोल्याचे नवे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी दिली. जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर लोकमतसोबत ते बोलत होते. राज्य शासनामार्फत १४ मे रोजी ह्यआयएएसह्ण अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये अकोल्याचे जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नवे जिल्हाधिकारी म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जी.श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली. आठवडाभरानंतर सोमवारी अकोल्यात रुजू झालेले जी. श्रीकांत यांनी अरुण शिंदे यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. विदर्भात पहिल्यांदाच आलो. अकोला जिल्हय़ाचा लवकरच दौरा करणार असून, लोकप्रतिनिधी व लोकांशी संपर्क साधणार आहे. जिल्हय़ातील लोकप्र ितनिधी आणि लोकांसोबत चर्चा करून, त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा विचारात घेऊन, विकासकामांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे नवे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले. शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या विविध योजना जिल्हय़ातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. *अरुण शिंदे यांना निरोप! नवे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत रुजू झाल्यानंतर सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात बदली झालेले जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांना अधिकारी व कर्मचार्‍यांच्यावतीने निरोप देण्यात आला. तसेच नवे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांचे स्वागत करण्यात आले.

Web Title: People's representatives will talk to people, give priority to the work!