शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

 ऑनलाइन प्रणालीद्वारे टॅक्सचा भरणा; अकोलेकरांमध्ये निरुत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:54 IST

वसुली निरीक्षकांकडूनही ‘पॉस’ मशीनचा वापर केला जात नसल्याची माहिती आहे.

अकोला : सर्वसामान्य नागरिकांना मालमत्ता कराचा भरणा थेट घरबसल्या करता यावा यासाठी महापालिका प्रशासनाने आॅनलाइन प्रणाली विकसित केली. या प्रणालीकडे अकोलेकरांनी पाठ फिरवली आहे. दरम्यान, या प्रणालीचा वापर न करणाऱ्या नागरिकांच्या घरी जाऊन ‘पॉस’ मशीनद्वारे कराचा भरणा करण्याचे वसुली निरीक्षकांना निर्देश होते. ‘पॉस’ मशीनच्या वापरामुळे मालमत्ता कराची पावती पुस्तके कालबाह्य करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र खुद्द वसुली निरीक्षकांकडूनही ‘पॉस’ मशीनचा वापर केला जात नसल्याची माहिती आहे.महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्ता कर विभागाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. काही विशिष्ट प्रभागातील नागरिकांजवळून कर वसुली न करता ती दडवून ठेवण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. या प्रकारामुळे वसुली निरीक्षकांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्याची वेळ आली होती. २०१६ उजाडेपर्यंत शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न झाल्यामुळे प्रशासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. अर्थातच त्याचा परिणाम शहर विकासावर झाला. २०१३ पर्यंत मालमत्ता कर विभागावर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे या विभागाचा पदभार सांभाळणाºया अधिकाऱ्यांनी निव्वळ स्वत:च्या तुुंबड्या भरण्याचे उद्योग केले. या सर्व बाबींना पूर्णविराम देण्यासाठी महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर विभागाची गाडी रुळावर आणण्यासाठी विविध उपाय केले. ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर संबंधित स्थापत्य नामक एजन्सीने अकोलेकरांना आॅनलाइन प्रणालीद्वारे घरबसल्या मालमत्ता कराचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. ज्या नागरिकांना या प्रणालीअंतर्गत कर जमा करता येत नसेल त्यांच्यासाठी घरपोच ‘पॉस’ मशीन पाठवून त्याद्वारे कराचा भरणा करण्याची सोय केली. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन करून सुधारित देयकांचे वाटप, कराचा भरणा करण्याच्या आदी प्रक्रियेला दोन वर्षांचा कालावधी होत आहे. यादरम्यान, नागरिकांनी आॅनलाइन प्रणालीच्या वापराकडे पाठ फिरवल्याचे चित्र समोर आले आहे.

‘पॉस’ मशीनचा सोयीनुसार वापरमनपा प्रशासनाने ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर कर वसुली विभागाच्या दप्तरी ३२ हजार मालमत्तांची नोंदच नसल्याचे उघडकीस आले होते. अशा मालमत्तांची नोंद करून त्यावर कर आकारणी केल्यानंतर पावती पुस्तिका कालबाह्य करण्याच्या उद्देशातून ‘पॉस’ मशीनचा वापर बंधनकारक करण्यात आला. या मशीनच्या वापरामुळे थकीत कराचा भरणा करताना कोणतीही लबाडी केल्यास त्याची नोंद संगणकाद्वारे निदर्शनास येईल; परंतु वसुली निरीक्षक या मशीनचा सोयीनुसार वापर करीत असल्याची माहिती आहे.मालमत्ताधारकांनी स्वत:हून पॉस मशीनचा आग्रह धरण्याची अपेक्षा आहे. या मशीनचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा, यासाठी वसुली लिपिकांना सूचना दिल्या आहेत. आॅनलाइन प्रणालीचा वापर केल्यास थक बाकीसंदर्भात कोणाचाही गोंधळ उडणार नाही.- विजय पारतवार, कर अधीक्षक, मनपा

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola Municipal Corporationअकोला महानगरपालिका