शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वीज ग्राहकांनी पाच दिवसांत केला १५ कोटींचा भरणा

By admin | Updated: November 18, 2016 03:06 IST

अकोला परिमंडळाने स्वीकारल्या जुन्या नोटा.

अकोला, दि. १७- काळय़ा पैशाला चाप लावण्यासाठी केंद्र सरकारने चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा बाद केल्यानंतर नागरिकांची गैरसोय होत असली, तरी वीज देयक भरण्यासाठी मात्र महावितरणकडून जुन्या नोटा स्वीकारण्यात येत आहेत. या निर्णयाचा फायदा घेत नागरिक मोठय़ा संख्येने जुन्या नोटांद्वारे वीज देयक भरत असून, गत पाच दिवसांत महावितरणच्या अकोला परिमंडळातील तीन जिल्हय़ांतील वीज ग्राहकांनी तब्बल १५ कोटी ४९ लाख १७ हजार रुपयांचा भरणा केल्याची माहिती समोर आली आहे.केंद्र सरकारने हजार-पाचशेच्या नोटा चलनातून रद्द केल्यामुळे सर्वांंचीच मोठी गोची झाली. त्यात महावितरणनेही जुन्या हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात येणार नसल्याचे परिपत्रक ९ नोव्हेंबर रोजी काढले होते. १0 नोव्हेंबर रोजी मात्र यामध्ये सुधारणा करण्यात आली. वीज देयक भरण्यासाठी शुक्रवार, ११ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपर्यंत जुन्या हजार-पाचशेच्या नोटा स्वीकारण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले. त्यानुषंगाने महावितरणच्या अकोला परिमंडळात मोडणार्‍या अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्हय़ांतील वीज ग्राहकांनी अधिकृत देयक केंद्रांवर मोठी गर्दी करण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी परिमंडळात ३ कोटी ६३ लाख रुपयांचा भरणा झाला. सुरुवातीला जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत १४ नोव्हेंबरपर्यंंत ठेवण्यात आली. त्यानंतर मात्र ही मुदत २४ नोव्हेंबरपर्यंंत वाढविण्यात आल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शुक्रवार, ११ नोव्हेंबर ते गुरुवार, १६ नोव्हेंबर या कालावधीत तिन्ही जिल्हय़ांतील वीज ग्राहकांनी १५ कोटी ४९ लाख १७ हजार रुपयांचा भरणा केला. नोटाबंदीचा असाही फायदाचलनातून हजार व पाचशेच्या नोटा रद्द झाल्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असला, तरी या निर्णयाचा महावितरणला चांगलाच फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. एरवी वीज देयक भरण्याबाबत फारसे उत्सुक नसलेले ग्राहक जुन्या नोटांद्वारे वीज देयक स्वीकारले जात असल्यामुळे ते भरण्याबाबत कमालीचे उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने का होईना जुन्या नोटांचा योग्य विनियोग होत असल्यामुळे त्याचा फायदा महावितरणाला होताना दिसत आहे.

जिल्हानिहाय असा झाला भरणाजिल्हा                देयक भरणाअकोला               ६ कोटी ५९ लाख ८२ हजारबुलडाणा              ६ कोटी ७५ लाख १८ हजारवाशिम                २ कोटी १४ लाख १७ हजार----------------------------------------------एकूण                   १५ कोटी ४९ लाख १७ हजार रुपये