शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

स्वप्नांसाठी ती झटली, यशाच्या शिखरावर पोहोचली! स्कूल बस चालकाच्या मुलीची संघर्षगाथा

By नितिन गव्हाळे | Updated: June 18, 2025 14:14 IST

MHT CET Result 2025: पल्लवीचे वडील, जगन्नाथ निमकंडे, प्रभाप्रकाश कॉन्व्हेंट येथे बस ड्रायव्हर आहेत. रोज सकाळी मुलांना शाळेत पोहोचवताना ते आपल्या मुलांसाठीचं शिक्षणही डोळ्यांत साठवत होते.

-नितीन गव्हाळे, अकोलाMHT CET Success Story: एक एकर शेत, घरात दररोजच्या गरजांसाठी संघर्ष, आणि वडील एका खाजगी शाळेच्या स्कूल बसचे चालक. अशा परिस्थितीतही एक मुलगी मोठं स्वप्न पाहते. "मला कॉम्प्युटर इंजिनिअर व्हायचं आहे!" आणि या स्वप्नासाठी ती झटली. लढली, आणि शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचली.

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ही गोष्ट आहे, पातूर तालुक्यातील आलेगाव येथील पल्लवी जगन्नाथ निमकंडे हिची. एमएचटी सीईटीच्या पीसीएम गटात तिने मिळवलेले ९९.४३ टक्के गुण हे तिच्या जिद्दीची पावती आहे. 

पल्लवीचे वडील, जगन्नाथ निमकंडे, प्रभाप्रकाश कॉन्व्हेंट येथे बस ड्रायव्हर आहेत. रोज सकाळी मुलांना शाळेत पोहोचवताना ते आपल्या मुलांसाठीचं शिक्षणही डोळ्यांत साठवत होते. केवळ एक एकर शेतीवर आधारित उत्पन्न, कधी वीज नाही, कधी पुस्तकं उधारीवर, तरीही जगन्नाथ आणि त्यांच्या पत्नीने मुलांच्या शिक्षणासोबत कधी तडजोड केली नाही.

पल्लवीचं शिक्षण जवाहर नवोदय विद्यालय, अकोला येथे झालं. त्यानंतर अकोल्यातील ललित ट्युटोरियल्समध्ये ती शिकू लागली. तिला योग्य दिशादर्शन मिळालं प्रा. ललित काळपांडे सरांकडून. "सरांनी मला अभ्यासात केवळ मदतच केली नाही, तर आत्मविश्वासही दिला. असं ती सांगते.

यशाच्या शिखरावर एक साधी मुलगी

१६ जून रोजी सीईटीचा निकाल लागला. मोबाईलवर गुण पाहताना तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. ९९.४३ टक्के गुण. माझं स्वप्न आता थोडं जवळ आलंय, पण अजून खूप काही शिकायचं आहे. माझं इंजिनिअर बनण्याचं स्वप्न पूर्ण करून आईबाबांना अभिमान वाटेल असं काहीतरी मोठं करायचं आहे," पल्लवी ठामपणे म्हणते.

भक्ती मेन १०० पसेंटाईल

स्वप्न मोठं असावं लागतं, पण त्यासाठी कष्ट अजून मोठे असावे लागतात." ही ओळ खरी करुन दाखवलीय अकोल्याच्या भक्ती मनिष मेन हिने. एमएचटी सीईटी पीसीबी गटाचा निकाल १७ जून रोजी जाहीर झाला, आणि या निकालात भक्तीने १०० पर्सेटाईल गुण घेत, थेट महाराष्ट्रातून पहिला क्रमांक प्राप्त केला. 

भक्ती अकोल्यातील जवाहर नगर येथे राहते. वडील मनिष मेन हे कृषी विभागाच्या बीज प्रमाणीकरण प्रयोगशाळेत अधिकारी आहेत. एकुलती एक असल्याने घरातली सगळी स्वप्नं तिच्यावर केंद्रित होती. 

लहानपणापासून डॉक्टर होण्याचा तिचा ध्यास आता पूर्ण होणार आहे. भक्तीने नीट २०२५ मध्ये ५६७ (एआयआर ६ हजार) त्यासोबतच सीईटीमध्ये तर थेट महाराष्ट्र टॉपर ठरली. तिच्या या दुहेरी यशामागे प्रा. ललित काळपांडे यांचे मार्गदर्शन आहे.

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षणAkolaअकोलाStudentविद्यार्थी