शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल घरफोड्यांना एक वर्षाचा कारावास

By admin | Updated: February 4, 2015 01:44 IST

अकोला न्यायालयाचा निर्णय: आरोपी बंगालमधील.

अकोला: घरफोडी करून हजारो रुपयांचा ऐवज लंपास करणार्‍या दोघा घरफोड्यांना मंगळवारी न्यायदंडाधिकारी काळे यांच्या न्यायालयाने सबळ पुराव्यांच्या आधारावर एक वर्षाच्या सश्रम कारावास आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. कौलखेड परिसरातील नागे ले-आउटमध्ये राहणारे संजय मधुकरराव ठाकरे हे २७ जून २0१४ रोजी कुटुंबासह बाहेरगावी गेले होते. पश्‍चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील बेलडांगा व माचपाडा गावात राहणारे सुखचंद जाफर शेख (२३) व त्याचा सहकारी मोहसीन शेख मोसलीन शेख (३६) यांनी ठाकरे यांचे घर फोडून हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. खदान पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक टिकाराम थाटकर यांनी घरफोडीचा तपास करून आरोपी सुखचंद व मोहसीन यांना अटक केली. आरोपी अद्यापही कारागृहात आहेत. पीएसआय थाटकर यांनी याप्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायदंडाधिकारी काळे यांच्या न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने न्यायालयाने दोघांनाही एक वर्षाचा सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिन्याचा कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे साहाय्यक सरकारी विधिज्ञ सिद्धार्थ साबळे यांनी बाजू मांडली.