शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना नव्हे, तर विद्यापीठाची जमीन खासगी कंपन्यांना!

By admin | Updated: May 29, 2015 01:59 IST

बीजोत्पादनासाठी जमीन मूळ मालकांना देण्याची शेतक-यांची मागणी.

विवेक चांदूरकर /अकोला: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत अधिग्रहण केलेल्या जमिनी बीजोत्पादनासाठी मूळ जमीनधारकांना न देता खासगी कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संपूर्ण विदर्भात हजारो हेक्टर जमीन अधिग्रहित केली आहे. या विद्यापीठाने शेतकर्‍यांच्या सुपीक जमिनी अत्यंत कमी भावात घेतल्या. ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना ना नोकरी मिळाली ना दुसरीकडे जमिनी मिळाल्या. त्यामुळे त्या शेतकर्‍यांच्या वारसांवर रिक्षा चालविण्याची किंवा मजुरी करण्याची पाळी आली आहे. कृषी विद्यापीठाने अधिग्रहित केलेल्या जमिनीपैकी शेकडो हेक्टर जमीन सध्या पडीक आहे. ही जमीन बीजोत्पादनासाठी मूळ मालक शेतकर्‍यांना देण्यात यावी, अशी मागणी या शेतकर्‍यांची आहे; मात्र विद्यापीठ सदर जमीन खासगी कंपन्यांना देत आहे. कृषी विद्यापीठाच्या अधिग्रहित जमिनीवर शैक्षणिक, प्रायोगिक, प्रात्यक्षिक संशोधन करून शेतकर्‍यांसाठी बीजोत्पादन करण्याचा उद्देश होता. त्याकाळी विद्यापीठाने आवश्यकतेपेक्षा जास्त शेतकर्‍यांची सुपीक जमीन अधिग्रहित केली. त्यामुळे शिल्लक असलेल्या जमिनीवर विद्यापीठ सध्या दिखाऊ व व्यावसायिक पिके घेत आहे. महामार्गालगतच्या भागात विद्यापीठ पीक घेते, त्या मागील शेती मात्र पडीक आहे. विद्यापीठाने अधिग्रहित केलेल्या जमिनीवर झाडे व जंगल वाढले आहे. यामध्ये जंगली डुकरे, नीलगाय, हरीण, सांबर यांचा सतत वावर असतो. हे प्राणी या जंगलांमध्ये वास्तव्यास राहून, शेतकर्‍यांची पिके फस्त करतात. विद्यापीठ व्यावसायिक पिके घेण्याचा केवळ आव आणत आहे, त्यांचे उत्पादन नगण्य आहे. *ग्रामपंचायतींनी घेतला ठराव अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ातील शेकडो गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी विद्यापीठाने अधिग्रहित केल्या आहेत. ज्या गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी विद्यापीठाकडे आहेत, त्या गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांच्याकडेच बीजोत्पादनासाठी भाड्याने देण्याचा ठराव ग्रामपंचायतींनी घेतला आहे.

*कृती आराखडा तयार

       सवरेदय शेतकरी समस्या निवारण समितीने विद्यापीठाकडे असलेल्या जमिनी मूळ शेतमालकांना कशाप्रकारे द्यायची याचा कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये त्यांनी ती जमीन कुणाची होती, त्याचे वारसदार सध्या गावामध्ये कोण वास्तव्यास आहेत, त्यापैकी कोण शेती करतो, त्यालाच सदर जमीन देण्याची मागणी करण्यात आली आहे.