शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

मोटर वाहन विभागात घंटागाड्यांची नोंदच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 13:37 IST

आता मात्र घंटागाडीवरील वाहन चालकांनी त्यांचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महापालिकेच्या मोटर वाहन विभागाचा कारभार रसातळाला गेला असून, त्याचे परिणाम समोर येऊ लागले आहेत. या विभागाच्या अखत्यारीत असलेल्या घंटागाड्या बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही घंटागाड्या बेवारस स्थितीत असताना संबंधित जबाबदार वाहन चालकाला जाब विचारण्याची हिंमत विभाग प्रमुख श्याम बगेरे यांना नसल्यामुळे की काय, या विभागाचे ‘तीन-तेरा’ वाजल्याचे केविलवाणे चित्र आहे. या गंभीर प्रकरणाची महापालिका आयुक्त संजय कापडणीस दखल घेतील का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.शहरात दररोज २२० टनपेक्षा अधिक कचरा निर्माण होतो. २०१५ पूर्वी घरातून निघणारा कचरा सर्व्हिस लाइनमध्ये उघड्यावर टाकणे किंवा घरासमोर रस्त्यालगत फेकून दिल्या जात असल्याचे चित्र होते. मुख्य बाजारपेठेतही हीच स्थिती होती. यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात घाणीचे ढीग साचल्याची परिस्थिती होती. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी प्रत्येक घरातून, बाजारपेठेतून कचरा जमा करण्यासाठी पहिल्या टप्प्यात ८० आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित ४५ वाहनांची खरेदी केली. मनपाची आर्थिक स्थिती भक्कम नसल्यामुळे मानधन किंवा कंत्राटी तत्त्वावर वाहन चालकांची नियुक्ती करण्यापेक्षा घंटागाडीवर ‘स्वयंसेवकां’ची नियुक्ती करण्याचे धोरण पत्करले. घरातून कचरा जमा करण्याच्या बदल्यात प्रतिमहिना ३० रुपये आणि दुकाने, कमर्शियल कॉम्प्लेक्स, हॉस्पिटल, हॉटेल, महाविद्यालय व बाजारपेठमधून कचरा जमा करण्याच्या बदल्यात प्रतिमहिना २०० रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला.जमा केलेले शुल्क वाहन चालकाला मानधन म्हणून देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सुरुवातीला काही दिवस सर्व काही सुरळीत सुरू असताना आता मात्र घंटागाडीवरील वाहन चालकांनी त्यांचे खरे रंग दाखविण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.दुपारी २ वाजतापर्यंत कचरा जमा करून तो नायगावस्थित डम्पिंग ग्राउंडवर टाकल्यानंतर घंटागाड्या मोटर वाहन विभागात जमा करणे अपेक्षित नव्हे बंधनकारक आहे. तसे होत नसल्यामुळे काही वाहने बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

इंधनात घोळ; रात्री ११ वाजता सेवा कशी?मनपाच्यावतीने प्रत्येक घंटा गाडीमध्ये त्या प्रभागाचे आणि नायगावातील डम्पिंग ग्राउंडचे अंतर लक्षात घेता किमान ६ ते ७ लीटर इंधन भरल्या जाते. दुसरीकडे रात्री ११ वाजता हॉटेलमधील अन्नपदार्थ चक्क राष्ट्रीय महामार्गालगत टाकण्यासाठी घंटा गाड्यांचा वापर होत असल्याचे दिसून येते. काही घंटा गाडी चालक भाजी बाजारातील सडका भाजीपाला व खानावळी, हॉटेलमधील शिळे अन्न जमा करून वराह पालन करणाºया व्यावसायिकांना विक्री करीत असल्याची माहिती आहे. हा सर्व खेळ रात्री चालत असताना मोटरवाहन विभागाने जाणीवपूर्वक डोळ््यांवर पट्टी बांधल्याचे चित्र दिसून येते.

वाहनांची दररोज नोंद ठेवणे क्रमप्राप्त आहे. सायंकाळी किंवा रात्री कचरा जमा करण्याचे कोणतेही निर्देश नाहीत. घंटा गाडीचा खासगी कामासाठी वापर होणे ही गंभीर बाब असून, यासंदर्भात विभाग प्रमुखांना जाब विचारला जाईल. दोषी आढळणाऱ्यांची गय केली जाणार नाही.- संजय कापडणीस,आयुक्त, मनपा

 

टॅग्स :Akola Municipal Corporationअकोला महानगरपालिकाAkolaअकोला