शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात दुसर्‍या दिवशीच्या विसर्जनाला गालबोट

By admin | Updated: September 10, 2014 01:41 IST

अकोलाचा युवक पूर्णेच्या पुरात वाहून गेला तर खाई नदीत बुडून अकोट येथील एकाचा मृत्यू.

अकोला: पहिल्या दिवशीचे विसर्जन शांततेत आटोपल्यानंतर दुसर्‍या दिवशीच्या गणेश विसर्जनाला मात्र गालबोट लागले. गणेश विसर्जनासाठी गेलेला जठारपेठेतील २८ वर्षीय युवक पूर्णेच्या पुरात वाहून गेल्याची घटना मंगळवारी दुपारी ३.३0 वाजताच्या सुमारास घडली. बेपत्ता झालेल्या युवकाचा उशिरा रात्रीपर्यंत शोध सुरू होता. जठारपेठ भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरात राहणारा मनोज ऊर्फ पिंट्या प्रवीण उके (२८) हा दिवेकर आखाड्याजवळील आदर्श गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचे विसर्जन करण्यासाठी मंगळवारी दुपारी गांधीग्रामला गेला. गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर मनोज उके याला नदीमध्ये अंघोळ करण्याचा मोह आवरला नाही आणि गांधीग्रामच्या पुलावरून खळाळत्या पाण्यामध्ये उडी घेतली; परंतु तो बराच वेळपर्यंत बाहेर न आल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांना शंका आली. त्यांनी आरडाओरड सुरू केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. गावातील काही युवकांनी नदीमध्ये उडी घेत, मनोजला शोधण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत मनोजचा शोध घेणे सुरू होते. * आकोटात खाई नदीत बुडून एकाचा मृत्यू आकोट शहरातून वाहणार्‍या खाई नदीमध्ये एका भूमिहीन शेतमजुराचा नदीच्या पुरात बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३0 वाजताच्या दरम्यान घडली. पोपटखेड धरणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरणाचे दरवाजे काही प्रमाणात उघडण्यात आले. त्यामुळे खाई नदीला पूर आला आहे. दरम्यान मोठे बारगण-गुजर प्लॉट येथील रहिवासी संतोष रामदास कपले (२२) हे दुपारी खाईनदीच्या काठावर गेले होते. पाय घसरून नदीच्या पाण्यात पडल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.