शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

नेहरू कप हॉकी स्पर्धा; मुलींमध्ये यवतमाळ, मुलांमध्ये अमरावती मनपा विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 1:41 PM

नेहरू कप हॉकी स्पर्धेत मुलींच्या गटात यवतमाळ आणि मुलांच्या गटात अमरावती महानगरपालिका संघाने विजय मिळवून राज्यस्तर स्पर्धेकरिता प्रवेश निश्चित केला.

ठळक मुद्देअंतिम सामना बुलडाणा आणि अमरावती मनपा संघात खेळला गेला.अमरावती मनपा संघाने १-० ने सामना जिंकू न राज्यस्तर स्पर्धेकरिता पात्रता सिद्ध केली.यवतमाळ संघाने अमरावती मनपावर ३-० असा सहज विजय मिळवित, राज्यस्तर स्पर्धेत प्रवेश निश्चित केला.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ क्रीडांगण येथे शनिवारी खेळल्या गेलेल्या १७ वर्षीय विभागीयस्तर नेहरू कप हॉकी स्पर्धेत मुलींच्या गटात यवतमाळ आणि मुलांच्या गटात अमरावती महानगरपालिका संघाने विजय मिळवून राज्यस्तर स्पर्धेकरिता प्रवेश निश्चित केला. दोन्ही संघ राज्यस्तर स्पर्धेत अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व हॉकीअकोला यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धेचे आयोजन केले आहे. शनिवारी मुलांच्या गटात पहिला उपान्त्य सामन्यात बुलडाणा संघाने अकोला महानगरपालिका संघाला ३-० ने पराभूत केले. दुसऱ्या सामन्यात अमरावती मनपाने यवतमाळ संघाला ५-० ने हरवित अंतिम सामन्यात प्रवेश निश्चित केला. अंतिम सामना बुलडाणा आणि अमरावती मनपा संघात खेळला गेला. सामन्यात दोन्ही संघाने तुल्यबळ लढत दिली. शेवटी अमरावती मनपा संघाने १-० ने सामना जिंकू न राज्यस्तर स्पर्धेकरिता पात्रता सिद्ध केली.मुलींच्या गटातील पहिला उपान्त्य सामना अकोला मनपा व यवतमाळ जिल्हा संघात झाला. यवतमाळने अकोला मनपा संघाला २-० ने हरवून अंतिम फेरीसाठी स्थान निश्चित केले. दुसºया सामन्यात अमरावती मनपाने अकोला जिल्हा संघाला ३-० ने नमविले. अंतिम सामना अमरावती मनपा व यवतमाळ जिल्हा संघात झाला. यामध्ये यवतमाळ संघाने अमरावती मनपावर ३-० असा सहज विजय मिळवित, राज्यस्तर स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. पोलीस मुख्यालयाचे आरपीआय विकास तिडके, हॉकी असोसिएशनचे उपाध्यक्ष डॉ. संदीप चव्हाण, सचिव धीरज चव्हाण, सुशील सुर्वे, उमेश बिडवे, खेळ विभागप्रमुख सलीम शेख, राजू उगवेकर, भूषण साळवे, अजय कांबळे, विशाल निंबाळकर, मयूर निंबाळकर, स्वप्निल अंभोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या संघाला बक्षीस वितरित करण्यात आले. स्पर्धेत पंच म्हणून शुभम निंबाळकर, अभिजित तिवळकर, चंदन ठाकूर, ऋषभ खत्री, मयूर चौधरी, यश पवार, शाहरू ख खान, दीपिका सोनार यांनी काम पाहिले. जिल्हा क्रीडा अधिकारी आसाराम जाधव यांच्या मार्गदर्शनात स्पर्धा यशस्वी पार पडली.फोटो:०९सीटीसीएल३८

 

टॅग्स :AkolaअकोलाHockeyहॉकी