शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

राष्ट्रवादीचे कॅप्टन शरद पवार बारावा गडी :   मुख्यमंत्र्यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 12:09 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवित सैन्याच्या कारवाईचा उदो-उदो केला

चिखली/ तेल्हारा : काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पराभूत मानसिकतेच्या नेत्यांचा पक्ष असून, या पक्षाच्या कॅप्टनने खेळण्यापूर्वीच मी बॅटींग करणार नाही आणि बारावा गडी असल्याचे जाहीर केले, अशा शब्दात शरद पवारांना टीकेचे लक्ष्य करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्याच परिवाराची गरिबी हटली, असा घणाघाती आरोप केला.अकोल्यातील भाजपा उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारार्थ तेल्हारा व बुलडाण्यातील शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी चिखली येथे आयोजित सभेत त्यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवित सैन्याच्या कारवाईचा उदो-उदो केला. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश व देशाची सुरक्षा मजबूत झाली आहे. पाकिस्तानला समजेल अशा भाषेत उत्तर देण्यासाठी मोदींनी एअर स्ट्राइक केले व देशाचा आत्मसन्मान वाढविला, त्यामुळे मोदी हेच सक्षम पर्याय आहेत. मोदींच्या नेतृत्वामुळे देश कमजोर नाही, हे लोक आता मानायला लागल्याचे सांगत काँग्रेसचे नेते एअर स्ट्राइकचा पुरावा द्या, पुरावा द्या करत गोंधळ घालत आहेत. हे जर आधी माहीत असते तर आम्ही त्यावेळी एखाद्या मिसाईला तुम्हालाच बांधून पाठवले असते, अशी टीकादेखील त्यांनी यावेळी केली. राहुल गांधी यांनी आणलेली ‘गरिबी हटाव’ या योजनेची खिल्ली उडविली. त्यांच्या पाच पिढ्यांकडून गरिबी हटली नाही, याउलट ‘गरिबी हटाओ’च्या घोषणा देऊन त्यांनी स्वत:चीच घरे भरली, असा घणाघाती आरोप केला. यावेळी भाजपा सरकारच्या काळातील विविध योजनांचे दाखले देत विकासाच्या मुद्यावरही विरोधकांना टीका करण्याची संधी नसल्याचे स्पष्ट केले. -तर शेतकऱ्यांना पेन्शन देणारा भारत हा पहिला देशपुन्हा सत्ता मिळाल्यास वयाची ६० वर्षे पूर्ण करणाºया शेतकऱ्यांना पेन्शन लागू करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. शेतकºयांना पेन्शन सुरू करणारा भारत हा पहिला देश राहील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसakola-pcअकोलाSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण