शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

नवोदय विद्यालयातील ‘तो’ विद्यार्थी भुसावळमध्ये सापडला!

By admin | Updated: January 20, 2015 01:00 IST

प्राचार्यांनी दिली होती अपहरणाची तक्रार.

अकोला: बाभूळगाव जहाँगीर येथील नवोदय विद्यालयातील १७ वर्षीय विद्यार्थ्याचे अज्ञात व्यक्तींनी अपहरण केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजतानंतर घडली. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला; परंतु हा विद्यार्थी सोमवारी रात्री भुसावळ शहरात सापडला असून, तो सुखरूप असल्याची माहिती नवोदय विद्यालयाचे प्राचार्य आर.ए. सिंह यांनी दिली. नवोदय विद्यालयाचे प्राचार्य रामवतार तपेश्‍वर सिंह (४२) यांनी सोमवारी दुपारी सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार देऊन त्यांच्या विद्यालयातील इयत्ता ११ वीमध्ये शिकणारा विद्यार्थी सचिन श्रीकृष्ण वासनिक (१७) याला रविवारी रात्री ११ वाजतानंतर वसतिगृहातून कोण्यातरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचे म्हटले होते. यासंदर्भात प्राचार्य सिंह यांनी वासनिक याच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना घटनेची माहिती दिली होती. रामवतार सिंह यांच्या तक्रारीनुसार, सिव्हिल लाइन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल केला; परंतु सचिन वासनिक हा भुसावळमध्ये सापडला असून, त्याचे कोणीही अपहरण केले नाही. त्याच्यासोबत संपर्क झाला असून, त्याने आपण मर्जीने मित्रांसोबत गेल्याचे स्पष्ट केले. सचिनला सध्या भुसावळ शहरातील नवोदय विद्यालयामध्ये ठेवण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य सिंह यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. त्याचे पालक भुसावळला रवाना झाले असून, सचिन वासनिक हा अकोल्यात आल्यानंतरच तो कुठे आणि कोणासोबत गेला होता, हे स्पष्ट होईल.