शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

मूर्तिजापूर : एसटी बसच्या वाहकास लाखपुरी फाट्यावर मारहाण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 9:18 PM

मूर्तिजापूर : बसच्या खिडकीतून प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्यास मज्जाव केल्याने तिघांनी वाहकास जबर मारहाण केल्याची घटना १९ जानेवारी रोजी दुपारी लाखपुरी फाट्यावर घडली. या प्रकरणी वाहकाच्या फिर्यादीवरून र्मतिजापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

ठळक मुद्देचौघांविरुद्ध गुन्हा दाखल बसच्या खिडकीतून चढण्यास मज्जाव केल्याने झाला वाद

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : बसच्या खिडकीतून प्रवेश करणार्‍या विद्यार्थ्यास मज्जाव केल्याने तिघांनी वाहकास जबर मारहाण केल्याची घटना १९ जानेवारी रोजी दुपारी लाखपुरी फाट्यावर घडली. या प्रकरणी वाहकाच्या फिर्यादीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.   दर्यापूर आगाराची बस एम. एच ४0 एन ८0७५  ही बस मूर्तिजापूर येथून प्रवासी घेऊन निघाली असता, दर्यापूर येथे पोहोचली.  प्रवाशांची गर्दी पाहता एका शाळकरी विद्यार्थ्याने जागा पकडण्यासाठी बसच्या खिडकीतून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्याला वाहक सागर गावंडे यांनी हटकले असता त्याने वाद घातला. त्या विद्यार्थ्याने याची माहिती लाखपुरी येथील भावाला फोनवरून दिली. गाडी लाखपुरी फाट्यावर आली असता आधीच फाट्यावर १0 ते १५ लोक थांबलेले होते. बस थांबली असता जमावातील तिघांनी वाहक सागर गावंडे यांच्याबरोबर वाद घालून  शिवीगाळ केली. तसेच बसमधील विद्यार्थ्याने बॅट वाहकाच्या छातीवर मारली.  तसेच एकाने त्यांना लाथा बुक्कानी मारहाण केली. या झटापटीत वाहकाचा शर्ट फाटला आणि तिकीट मशीन खाली पडून पैसे ही पडले. मारहाण करणारा विद्यार्थी लाखपुरी येथेच राहतो. वाहक गावंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी विद्यार्थ्यासह तिघांविरुद्ध भादंवि कलम ३५३, ३३२, ५0४, ३४  नुसार गुन्हा दाखल केला आहे.. पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrimeगुन्हाstate transportराज्य परीवहन महामंडळ