शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मजुराचे बोट तुटल्याने कारखाना मालकास एक महिन्याचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:38 IST

कारखान्याचे मालक बिपीनकुमार हरनारायण धूत, पर्यवेक्षक महेश गणेश चौधरी हे जबाबदार

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कारखान्यात काम करताना कल्पना विजयपुरी गोसावी यांच्या हाताचे बोट तुटल्याचे आणि त्यासाठी कारखान्याचे मालक बिपीनकुमार हरनारायण धूत, पर्यवेक्षक महेश गणेश चौधरी हे जबाबदार असल्याचे सिद्ध झाल्याने प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. ननावरे यांच्या न्यायालयाने बुधवारी त्यांना एक महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. एमआयडीसी क्रमांक ३ मधील अश्लेषा कंपनीमध्ये कल्पना गोसावी या मजूर म्हणून काम करतात. २ जानेवारी २0१0 रोजी कंपनीचे मालक बिपीनकुमार धूत, पर्यवेक्षक महेश चौधरी यांनी तिला जबरदस्तीने लोखंडाच्या पट्ट्या तयार करण्याचे काम दिले. मशीनवर काम करताना कल्पना गोसावी यांच्या हाताचे एक बोट तुटले. याप्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी दोघा आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३३८(३४) नुसार गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी बुधवारी प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी एम.डी. ननावरे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. आरोपींविरुद्ध सबळ पुरावे मिळून आल्याने न्यायालयाने त्यांना एक महिन्याचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहायक सरकारी विधिज्ञ ठोसर, अ‍ॅड. गोपाल गव्हाळे यांनी बाजू मांडली.