शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

मुद्रांकांचा गैरवापर; उमेश राठीसह दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 13:22 IST

अकोला: भूखंड व शेतीच्या प्रकरणांमध्ये अनेकांना गंडा घालणाऱ्या उमेश राठीने एका साथीदाराच्या मदतीने शासनाच्या १०० रुपयांच्या चार मुद्रांकांचा गैरवापर करीत त्या मुद्रांकांवर खाडाखोड करून उद्योजक विवेक पारसकर यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी राठीसह त्याच्या साथीदाराविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.

अकोला: भूखंड व शेतीच्या प्रकरणांमध्ये अनेकांना गंडा घालणाऱ्या उमेश राठीने एका साथीदाराच्या मदतीने शासनाच्या १०० रुपयांच्या चार मुद्रांकांचा गैरवापर करीत त्या मुद्रांकांवर खाडाखोड करून उद्योजक विवेक पारसकर यांच्याविरुद्ध षड्यंत्र रचून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी राठीसह त्याच्या साथीदाराविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे.रणपिसे नगरातील उमेश कन्हैयालाल राठी याने स्टॅम्पपेपर विक्रेता शहाबुद्दीन अलीमोद्दीन शेख याच्यासोबत संगनमत करीत २ जुलै २०१५ रोजी नोंद क्रमांक ४८५१ क्रमांकाचा मुद्रांक विवेक पारसकर यांच्यातर्फे धर्मेंद्र दोड यांना विक्री केल्याचे कटकारस्थान रचले. याच मुद्रांकांच्या आधारे त्यावर खाडाखोड करीत बनावट करारनामा, बनावट इसारपावती करीत उमेश राठीचा नातेवाईक भुसावळ येथील मनोज बियाणी याच्यासोबतच पारसकर यांनी भुसावळमधीलच प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवहार केल्याचे दाखवून इसारापोटी ९० लाख रुपये पारसकर यांना दिल्याचे दाखविण्यात आले. त्यानंतर पारसकर यांनी खरेदी करण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार पारसकर यांच्याविरुद्धच भुसावळ पोलीस ठाण्यात करून पारसकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता; मात्र प्रत्यक्षात पारसकर यांनी मुद्रांक खरेदी केलेला नसल्याचे भुसावळ पोलिसांच्या तपासात समोर आल्यानंतर मुद्रांक ज्या शहाबुद्दीन अलीमोद्दीन शेख याच्याकडून खरेदी केला, त्याची चौकशी केली असता त्याने पारसकर यांना ओळखत नसल्याचे सांगितले तसेच उमेश राठीच्या सांगण्यावरूनच हा प्रताप केल्याचे सांगितले. त्यामुळे विवेक पारसकर यांनी त्यांच्याविरुद्ध रचण्यात आलेल्या षड्यंत्रासह ९० लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी चौकशी केली असता विवेक पारसकर यांच्या नावाचा गैरवापर करीत चार मुद्रांक विकत घेण्यात आले व त्यावर खाडाखोड करीत उमेश राठी व शहाबुद्दीन अलीमोद्दीन शेख या दोघांनी विवेक पारसकर यांनाच फसवणुकीच्या प्रकरणात अडकविले तसेच त्यांच्याक डून ९० लाख रुपये खंडणी मागितल्याचेही उघड झाले; मात्र हे षड्यंत्र रचताना मुद्रांक नोंदणीच्या रजिस्टरवर पारसकर यांचे नाव आहे तर इसारपावतीसाठी वापरलेल्या मुद्रांकावर दुसऱ्याच व्यक्तीने नाव असल्याने तसेच दोन्ही अक्षरात व मजकुरात प्रचंड तफावत असल्यामुळे हे षड्यंत्र पोलीस चौकशीत समोर आले. त्यामुळे सिटी कोतवाली पोलिसांनी उमेश राठी व शहाबुद्दीन अलीमोद्दीन शेख या दोघांविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६८, ४७१, ३८४, १२० ब आणि मुंबई मुद्रांक अधिनियमच्या कलम ६३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी