शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

अकोल्यात पाच रुपयांनी वधारले दुधाचे भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 16:06 IST

आता ५५ रुपये लीटरच्या दराने अकोलेकरांना दूध विकत घेण्याची पाळी आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : सरकी ढेपचे भाव आटोक्यात येत नसल्याने अखेर पशुपालकांनी स्वातंत्र्य दिनापासून अकोल्यात पाच रुपयांनी दुधाचे भाव वाढविले. पशुपालकांच्या या धोरणात्मक निर्णयामुळे आता ५५ रुपये लीटरच्या दराने अकोलेकरांना दूध विकत घेण्याची पाळी आली आहे.दुधाळ जनावरांसाठी विदर्भातील सरकी ढेपला विशेष मागणी असते. सरकी ढेपची मागणी लक्षात घेत सटोडियांनी, गत तीन महिन्यांपासून सरकी ढेपचे भाव वाढविले. तीन महिन्यांआधी १८-२५ रुपये किलो विकल्या जाणारी सरकी ढेप आता ३३ -३८ रुपये किलोच्या दराने विकल्या जात आहे. सातत्याने वाढत असलेल्या सरकी ढेपच्या दरवाढीमुळे पशुपालक कमालीचे त्रासले. सरकी ढेपच्या भाववाढीचे कारण समजत नसल्याने अकोल्यातील साडेतीनशे पशुपालकांनी मंगळवार, १३ आॅगस्ट रोजी डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात बैठक घेऊन दुधाच्या दरात भाववाढ करण्यावर चर्चा केली. त्यानंतर बुधवार, १४ आॅगस्ट रोजी, शेकडो पशुपालकांनी अकोला शहरातून मोटारसायकल रॅली काढून डेअरी संचालकांना अवगत केले. या रॅलीत बाबासाहेब अतकरे, राजू पाटील-गावंडे, सुधीर बंड, नीळकंठ खेडकर, बाळू पाटील खेडकर, विजय दुबे, हरणे, ज्ञानू काळे, विष्णू घटीक, गोविंदा गावंडे, राहुल जायले, गणेशभाऊ, उमाबाई, अक्षय गावंडे, शुभम देशमुख आदी प्रामुख्याने सहभागी झाले होते.

अकोला शहर परिसरात दररोज चार हजार लीटर दुधाची विक्री केली जाते. सव्वा दोन लाख रुपयांची दररोजची उलाढाल होते. पुडीच्या दुधाची यात मोजदात नाही. सरकी ढेपच्या दरवाढीची समस्या सोडविल्या न गेल्याने पर्यायाने पशुपालकांना दुधाच्या दरात वाढ करावी लागली.-राजू गावंडे,पशूपालक, अकोला.

टॅग्स :milkदूधAkolaअकोला