मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक झालीच नाही!

By Admin | Updated: May 26, 2015 02:32 IST2015-05-26T02:32:09+5:302015-05-26T02:32:09+5:30

डीसी रूलसह विविध मुद्यांवरील चर्चा बारगळली

Meeting with CM did not even happen! | मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक झालीच नाही!

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक झालीच नाही!

अकोला: मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करणे, डीसी रूलच्या प्रस्तावासह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या रिक्त पदासंदर्भात चर्चा करण्यासाठी आयुक्त सोमनाथ शेटे यांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांचा वेळ मागितला होता. परंतु ऐनवेळेवर मुख्यमंत्र्यांच्या व्यस्त कामकाजामुळे पूर्वनियोजित बैठक रद्द झाली असून, महत्त्वाच्या मुद्यावरील चर्चा बारगळल्याची माहिती आहे. मनपा प्रशासनाला थकीत वेतनासाठी निधी उपलब्ध करणार नसल्याचे स्पष्ट करीत शासनाने उत्पन्न वाढीच्या सूचना केल्या आहेत. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन आणि अवैध पाणीपट्टीधारकांची मोठी संख्या लक्षात घेता, उत्पन्न वाढीसाठी मोठा वाव आहे. ही बाब लक्षात आल्याने प्रशासनाने १९९८ नंतर प्रथमच मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन सुरू केले. पुनर्मूल्यांकनासोबतच भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करणे नितांत गरजेचे आहे. स्वतंत्र बांधकाम विकास नियंत्रण नियमावली (डीसी रूल) चा प्रस्ताव लागू केल्यास हार्डशिप अँन्ड क म् पाउंडिंगच्या दर आकारणीच्या माध्यमातून मनपाला चांगले उत्पन्न प्राप्त होईल. यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी आयुक्त सोमनाथ शेटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोमवारी वेळ मागितला होता. मुख्यमंत्र्यांनीसुद्धा होकार दर्शविला. परंतु मुख्यमंत्र्यांच्या व्यस्ततेमुळे ही बैठक ऐनवेळेवर स्थगित करण्यात आली. मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर संबंधित मालमत्ताधारकांना भांडवली मूल्यावर आधारित कर प्रणाली लागू करणे, जीआयएस, शहर बस सेवेच्या निविदेसाठी सर्वसाधारण सभेच्या मंजुरीची आवश्यकता आहे. यासंदर्भात सत्तापक्षाने सकारात्मक निर्णय घेणे प्रशासनाला अपेक्षित आहे.

Web Title: Meeting with CM did not even happen!