शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भातील सहकार क्षेत्रातील समस्यांवर पुण्यात मंथन

By admin | Updated: February 23, 2015 01:47 IST

लोकप्रतिनिधींनी मांडल्या कापूस उत्पादकांच्या व्यथा.

अकोला- पश्‍चिम विदर्भातील सहकार क्षेत्रातील समस्यांवर पुण्यात आयोजित सहकार व पणन मंत्र्यांच्या आढावा बैठकीत मंथन करण्यात आले. रविवारी झालेल्या या बैठकीत आमदार रणधीर सावरकर यांच्यासह पश्‍चिम विदर्भातील लोकप्रतिनिधींनी कापूस उत्पादकांच्या व्यथा मांडल्यात. पश्‍चिम विदर्भात मोठय़ाप्रमाणावर कापूस उत्पादन होते. या पट्टय़ात कापसाशिवाय दुसर्‍या नगदी पिकाचा आधार नाही. या भागात मोठय़ाप्रमाणावर शेतकरी आत्महत्या करीत असताना येथे कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करण्याऐवजी बंद पाडले जात आहेत. स्पिनिंग हबसारख्या योजनांमध्ये अकोल्यातील नीळकंठ सूतगिरणी, सावतराम मिल, मोहता मिल पुनर्जीवित करता येऊ शकते, याकडे आमदार सावरकर यांनी पुण्यातील बैठकीत सहकार व पणन मंत्री चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले. राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी भरती प्रक्रियेतील घोळाकडे या बैठकीत लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांचे लक्ष वेधले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील वर्षानुवर्षांपासून सेवा देत असलेल्या कर्मचार्‍यांना पंधरा दिवसात कामावरून कमी करण्याचे आदेश पणन संचालकांनी डिसेंबर २0१४ मध्ये दिले होते. १५ ते २0 वर्षांपासून सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांना कामावरुन कमी करणे, हा त्यांच्यावरील अन्याय असल्याचे आ. सावरकर यांनी सांगून परिपत्रक मागे घेण्यासोबतच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. या बैठकीत सहकार क्षेत्रातील समस्यांबाबत आढावा घेण्यासोबतच सर्वंकष धोरण निश्‍चितीसाठी आढावा घेण्यात आला. बैठकीला विधान सभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आ. सतीश देशमुख, आ. स्नेहलता कोल्हे, माजीमंत्री बबनराव पाचपुते, सहकार सचिव आणि सहकार आयुक्तांसह इतर अधिकारी उपस्थित होते.