आलेगाव: मळसूर येथील ४0 वर्षीय विवाहितेचा खून करून ितचे प्रेत विवरा फाट्याजवळील जंगलात रस्त्यावर टाकल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पातूर पोलिसांनी वाडेगाव येथील एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले. विवरा फाट्याजवळील जंगलात शेतातून घराकडे जात असलेल्या मजुरांना एका महिलेचे प्रेत आढळले. ही बाब विवराच्या पोलीस पाटलांनी पातूर पोलिसात कळविली. घटनेची माहिती मिळताच पातूरचे ठाणेदार खंडेराव यांनी आपल्या सहकार्यांसह घटनास्थळावर धाव घेतली. तसेच पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथे पाठवण्यात आला. मळसूर येथील कविता पटेल हिचा विवाह काही महिन्यांअगोदर झाला होता; परंतु गेल्या अनेक दिवसां पासून कविता पटेल ही मळसूर येथील माहेरी राहत होती. घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजय सागर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे बाळापूरचे उ पविभागीय पोलीस अधिकारी, पातूरचे डी. सी. खंडेराव यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. घटना स्थळावर डॉग स्काटला पाचारण करण्यात आले होते; परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. काही दिवसांअगोदर शारीरिक शोषण झाल्याची तक्रार करण्यात आली होती; परंतु त्यामध्ये कारवाई होण्याऐवजी प्रकरण आपसात मिटवण्यात आले होते. त्या प्रकरणाशी या घटनेचा काही संबंध आहे काय याची चौकशीसुद्धा पोलीस करीत आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी रात्री वाडेगाव येथील एकास चौकशीसाठी ताब्यात घे तले आहे.
मळसूर येथील विवाहितेची निर्घृण हत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 01:16 IST
आलेगाव: मळसूर येथील ४0 वर्षीय विवाहितेचा खून करून ितचे प्रेत विवरा फाट्याजवळील जंगलात रस्त्यावर टाकल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पातूर पोलिसांनी वाडेगाव येथील एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले.
मळसूर येथील विवाहितेची निर्घृण हत्या!
ठळक मुद्देविवरा फाट्याजवळ टाकले प्रेत चौकशीसाठी एक ताब्यात!