शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

Vidhan Sabha 2019 : रासप, शिवसंग्रामच्या अपेक्षा वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 4:03 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- सेना वगळता मित्रपक्षाच्या वाट्याला अवघ्या १३ ते १८ जागा येण्याची शक्यता

- राजेश शेगोकारअकोला : लोकसभा निवडणुकीतील विजयाने आत्मविश्वास वाढलेल्या भाजपाने विधानसभा निवडणुकीसाठी मिशन २२० प्लस हाती घेतले असून, मित्रपक्षांना सोबत ठेवणार, अशी ग्वाही वेळोवेळी दिली आहे; मात्र जागा वाटपाच्या समीकरणांमध्ये सेना वगळता मित्रपक्षाच्या वाट्याला अवघ्या १३ ते १८ जागा येण्याची शक्यता आहे. शिवसंग्राम व रासप या दोन पक्षांच्या गत वर्षभरात वाढलेल्या महत्त्वाकांक्षा लक्षात घेता महायुतीच्या या संभाव्य जागा वाटपात त्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे व रासपचे नेते दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी महायुतीचा घटक पक्ष म्हणून संपूर्ण कार्यकाळात भाजपाची पाठराखण केली तसेच आपापल्या पक्षांची बांधणी करून विधानसभा निवडणुकांची तयारी केली आहे. शिवसंग्राम व रासप या दोन्ही पक्षांनी प्रत्येकी १२ जागांवर दावा केला असून, रिपाइं आठवले गट, रयत स्वाभिमानी शेतकरी संघटना या घटक पक्षांनाही मतदारसंघ हवे आहेत. त्यामुळे १३ ते १८ जागांमध्ये या मित्रपक्षांचे समाधान करणे शक्य नसल्याचे स्पष्टच आहे. शिवसंग्रामला गत विधानसभेत केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. त्यापैकी वर्सोवाची एक जागा जिंकून शिवसंग्रामने आपले अस्तित्व कायम ठेवले तर बीडमध्ये खुद्द मेटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले व अकोल्यातील बाळापुरात ऐनवेळी शिवसंग्रामऐवजी भाजपाला एबी फॉर्म मिळाला होता. दुसरीकडे मेटे यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवित पूर्ण चार वर्षे झुलवित ठेवले व नंतर शिवस्मारकाची जबाबदारी देत बोळवण केली.या पृष्ठभूमीवर शिवसंग्रामने १२ जागांचा दावा रेटून धरला आहे. रासपने गतवेळी कन्नड, कमळनुरी, गंगाखेड, दौंड, अहमदपूर व बुम परगणा अशा सहा जागा लढविल्या होत्या. त्यापैकी दौंडची जागा जिंकून रासपने आपले अस्तित्व कायम ठेवले होते. या निवडणुकीत १२ मतदारसंघांमध्ये रासपने मोर्चेबांधणी केली आहे. त्यामध्ये विदर्भातील अकोट व बाळापूर या दोन मतदारसंघांचा समावेश आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Mahadev Jankarमहादेव जानकरVinayak Meteविनायक मेटे