शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

सर्वात कमी मतदारांच्या गावाची वाट खाचखळग्याची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 18:28 IST

अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सातपुडा पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या सदरपूरमध्ये १६२ मतदारांची संख्या असून, जिल्ह्यात सर्वात कमी मतदार असलेल्या या गावाची वाटदेखील खाचखळग्याची आहे.

- संतोष येलकर

अकोला: जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सातपुडा पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या सदरपूरमध्ये १६२ मतदारांची संख्या असून, जिल्ह्यात सर्वात कमी मतदार असलेल्या या गावाची वाटदेखील खाचखळग्याची आहे.लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १८ एप्रिल रोजी मतदान घेण्यात येणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातील तेल्हारा तालुक्यातील सदरपूर हे गाव सातपुडा पर्वतरांगांपासून जवळच आहे. जवळपास २०० ते २२५ लोकसंख्या असलेल्या सदरपूरमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खोली क्र.१ मध्ये एकच मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रांतर्गत गावातील १६२ मतदार आहेत. जिल्ह्यातील सर्वात कमी मतदारांची संख्या या गावात आहे. तेल्हाऱ्यापासून सदरपूर या गावाकडे जाणाºया रस्त्यावर सर्वत्र खड्डे पडले आहेत. सर्वात कमी मतदार संख्या असलेल्या या गावापर्यंत जाणे-येणे करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे गावात जाण्यासाठी खासगी वाहनांचाच ग्रामस्थांना वापर करावा लागतो. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात कमी मतदारांची संख्या असलेल्या या गावाची वाट खाचखळग्याची असल्याचे वास्तव आहे.तेल्हाºयापासून ३० कि.मी. अंतरावर आहे गाव!अकोला जिल्ह्यातील तेल्हाºयापासून ३० किलोमीटर अंतरावर सदरपूर हे गाव आहे. पहाडाच्या पायथ्याशी असलेल्या या गावात जिल्ह्यातील मतदारांच्या तुलनेत सर्वात कमी म्हणजे १६२ मतदारांशी संख्या असून, लोकसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेत या गावातील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.अकोला लोकसभा मतदारसंघात अशी आहे मतदारांची संख्या!विधानसभा मतदारसंघ               मतदारअकोट                                     २८०८४४बाळापूर                                  २९१७७९अकोला पश्चिम                      ३२८५२२अकोला पूर्व                             ३३८५४७मूर्तिजापूर                              ३१८८५२रिसोड                                     २९९४०७.......................................................एकूण                                       १८५७९५१

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकTelharaतेल्हारा