शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या बोहणीलाच घाटा

By admin | Updated: October 26, 2014 23:30 IST

कपाशीचे दर घसरले, खामगावासह पश्‍चिम व-हाडातील शेतकरी चिंताग्रस्त.

खामगाव : निर्यातबंदीचा फटका, अपूर्ण पाऊस, परतीच्या पावसाची गैरहजेरी, ऑक्टोबर हिटचा परिणाम.अशा चक्रातून कसेबसे बाहेर पडलेल्या कपाशीच्या उत्पन्नाचे दर कोसळल्याने अवसानच गळाले आहे. बोहणीलाच घाटा आल्याने शेतकर्‍यांसमोरील संकट गडद झाले असून दिवाळीच्या पर्वावर आर्थिक संकटाचाही सामना शेतकर्‍यांना करावा लागला.खासगी व्यापारी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कपाशी खरेदी करीत असले तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत हे दर दोन हजार रुपये प्रतिक्विंटलने खाली कोसळले आहेत.केंद्र सरकारने कपाशीची निर्यातबंदी केल्याने दर कोसळल्याचा हल्लाबोल राज्यात प्रचाराच्या निमित्ताने होत असून याचा प्रत्यय मात्र शेतकर्‍यांना येऊ लागला आहे. दर कोसळल्याने शे तकर्‍यांमध्ये असंतोष आहे. तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रात सिंचनाखालील कपाशीची लागवड केली जाते.* ऑक्टोबर हीटचा फटकातालुक्यात हजारो हेक्टरवर कोरडवाहू कपाशीचा पेरा होतो. यंदा पाऊस लेटलतीफ झाला. प्रारंभी उशिरा हजेरी लावलेल्या पावसाने नंतरच्या टप्प्यात ४५ दिवस दडी मारली. यामुळे ऐन वाढीच्या प्रक्रियेवर अनिष्ट परिणाम झाला. महिन्याभरापासून ऑक्टोबर हीटमुळे कपाशी पीक मातीमोल झाले असून जमिनीला भेगा पडल्या आहेत. गत महिन्यापासून पावसाची कम तरता आहे. परतीच्या दमदार पावसाची प्रतीक्षा कायम असून याचा फटका कोरडवाहू क पाशीला बसला आहे. हे उत्पन्न जवळपास ५0 टक्क्याने घटण्याची स्थिती आहे. यामुळे शे तकरी अधिक चिंतित असून याचा परिणाम दिवाळीच्या सणावरही पडला आहे. गेल्या चार वर्षांपासून मशागतीचाही खर्च निघणे मुश्किल झाल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.