शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

Lok Sabha Election 2019 : निवडणूक खर्चात वंचित बहुजन आघाडी आघाडीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 12:45 IST

निवडणूक खर्चानुसार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा निवडणूक खर्च सर्वाधिक असून, दुसºया क्रमांकावर भाजपा उमेदवार अ‍ॅड. संजय धोत्रे आणि तिसºया क्रमांकावर काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांचा निवडणूक खर्च आहे.

अकोला: अकोला लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणात उतरलेल्या ११ उमेदवारांकडून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे १३ एप्रिलपर्यंत सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चानुसार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा निवडणूक खर्च सर्वाधिक असून, दुसºया क्रमांकावर भाजपा उमेदवार अ‍ॅड. संजय धोत्रे आणि तिसºया क्रमांकावर काँग्रेस उमेदवार हिदायत पटेल यांचा निवडणूक खर्च आहे. त्यामुळे निवडणुकीचा खर्च करण्यात वंचित बहुजन आघाडी सध्या आघाडीवर असल्याचे वास्तव आहे.अकोला लोकसभा मतदारसंघात ११ उमेदवार निवडणूक लढवित आहेत. त्यामध्ये भाजपाचे अ‍ॅड. संजय धोत्रे, काँग्रेसचे हिदायत पटेल, वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर, बसपाचे बी. सी. कांबळे, पीपल्स पार्टी आॅफ इंडिया (डेमोक्रेटिक)चे अरुण वानखडे, बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रवीणा भटकर, अपक्ष गजानन हरणे, अपक्ष अरुण ठाकरे, अपक्ष प्रवीण कौरपुरीया, अपक्ष मुरलीधर पवार व अपक्ष सचिन शर्मा इत्यादी उमेदवारांचा समावेश आहे. निवडणूक रिंगणातील उमेदवारांकडून जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या खर्चविषयक कक्षाकडे १३ एप्रिलपर्यंत सादर करण्यात आलेल्या निवडणूक खर्चानुसार निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक निवडणूक खर्च वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांचा आहे. ८ एप्रिलपर्यंत अ‍ॅड. आंबेडकर यांचा निवडणूक खर्च ३२ लाख १६ हजार १६८ रुपये असून, दुसºया क्रमांकावर भाजपाचे उमेदवार अ‍ॅड. संजय धोत्रे यांचा ९ एप्रिलपर्यंत १७ लाख ५८ हजार ६६५ रुपये निवडणूक खर्च आहे, तर तिसºया क्रमांकावर काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल यांचा ९ एप्रिलपर्यंत ३ लाख ५८ हजार ७४० रुपये निवडणूक खर्च आहे.अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी आतापर्यंत केलेला खर्च बघता, त्यामध्ये निवडणूक खर्च करण्यात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसत आहे.उमेदवारांचा असा निवडणूक खर्च!उमेदवार                            पक्ष                                रक्कमअ‍ॅड. प्रकाश आंबेडकर        वंबआ                   ३२१६१६८अ‍ॅड. संजय धोत्रे               भाजपा                          १७५८६६५हिदायत पटेल                 काँग्रेस                      ३५८७४०बी. सी. कांबळे              बसपा                              ५८८८६अरुण वानखडे               पीपाइं                           ८४३७५प्रवीणा भटकर              बमुपा                             ९१८३६गजानन हरणे             अपक्ष                              २७०००मुरलीधर पवार            अपक्ष                             २८१९२अरुण ठाकरे               अपक्ष                              २०२९५प्रवीण कौरपुरीया         अपक्ष                               ३०८८७सचिन शर्मा                 अपक्ष                               ४१२८६निवडणूक निरीक्षक सोमवारी घेणार आढावा!अकोला लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक (खर्च) नागेंद्र यादव सोमवार, १५ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात उमेदवारांच्या निवडणूकविषयक खर्चाचा आढावा घेणार आहेत, असे उपजिल्हाधिकारी तथा खर्चविषयक नोडल अधिकारी अनिल खंडागळे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Vanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरBJPभाजपाSanjay Dhotreसंजय धोत्रे