शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

लॉकडाउन नावालाच; जिल्ह्यात येणाºयांचा ओघ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 11:16 AM

१ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १८४३० प्रवासी ग्रामीण भागात परत आले आहेत.

ठळक मुद्देसीमा सील; जिल्ह्यातील गावांमध्ये येणारांचा ओघ मात्र सुरूचबुधवारी ८०० प्रवासी दाखल : रात्रीची गस्त वाढविण्याची गरज

अकोला : जिल्ह्याच्या सीमा सील करून संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी कामानिमित्त देशासह, राज्यातील विविध शहरांमध्ये गेलेले लोक आता लॉकडाउनच्या काळात परत येत आहेत. १ एप्रिलपर्यंत जिल्ह्यात १८४३० प्रवासी ग्रामीण भागात परत आले आहेत. १ एप्रिल रोजी तब्बल ८०० प्रवासी अकोल्यातील विविध भागात दाखल झाले असल्याने सीमा सील करण्याच्या उद्देशाला हरताळ फासल्याचे समोर आले आहे.अकोल्यात १ एप्रिल रोजी दाखल झालेल्यांपैकी सर्वांची आरोग्य तपासणी झाली असून, १९३ जणांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठवण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी सांगितले.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन झाले. राज्यात संचारबंदीही लागू झाली. या परिस्थितीत आहे त्या ठिकाणी न राहता हजारो लोकांनी जिल्ह्यातील मूळ गावाकडे धाव घेतली. त्यातून कोरोना प्रसाराचा धोका आणखीच वाढत आहे.दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी गावांच्या सीमा सील करण्याचा आदेश देतानाच त्यांची तपासणी अनिवार्य केली आहे. जिल्ह्यात परत येणाऱ्यांच्या जत्थ्यांनी आरोग्य यंत्रणेचा ताण कमालीचा वाढवला आहे. रात्री केला जातो दुचाकींचा वापरलॉकडाउनच्या काळात दिवसा पोलिसांची गस्त व बंदोबस्त असल्याने जिल्हा सीमा ओलांडण्याची हिंमत कोणी करत नाही; मात्र रात्री काही प्रमाणात बंदोबस्त सुस्तावल्यावर बाहेरगावी जाणाºयांचे प्रमाण वाढल्याची माहिती आहे. राष्टÑीय महामार्गावर बुधवारी रात्री पाहणी केली असता, मोठया प्रमाणात मोटारसायकलवरून युवक जाताना दिसले. काही युवकांनी महामार्गाच्या लगतचा कच्चा रस्ता यासाठी वापरल्याचीही माहिती आहे. नागपूर, अमरावतीमधूनही येत आहेत युवकनागपूर, अमरावती या मोठ्या शहरांमध्ये वास्तव्यास असलेल्या ग्रामीण भागातील युवकांना सध्या गावाकडे परतण्याचे वेध लागले आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्यामुळे हे तरूण मालवाहतुकीस परवानगी असलेल्या काही वाहनांची मदत घेताना दिसतात तर काही युवकांनी चक्क मोटारसायकलीवरूनच आपले गाव गाठण्याची धडपड सुरू केली आहे. शेजारी व ग्रामस्थांनी राहावे सजगशहरात दाखल होणाºया अशा प्रवाशांची माहिती त्यांच्या शेजाºयांनी तर गावात दाखल होणाºया अशा प्रवाशांची माहिती ग्रामस्थ, सरपंच व सजग ग्रामस्थांनी प्रशासनाला देणे गरजेचे आहे. या प्रवाशांची तपासणी झाली नाही अन् ते कोरोना विषाणूचे वाहक निघाले तर तो त्या परिवारासोबतच सर्वांसाठी धोका ठरणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस