शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या आयटी विभागाचे लॉक कागदोपत्री

By admin | Updated: June 13, 2017 00:32 IST

एकाच ठिकाणाहून मीटरचे रीडिंग; कैलास टेकडी, खदान, सिंधी कॅम्प, गीतानगरमध्ये ओरड

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड (महावितरण) द्वारा ज्या एजन्सीकडून मीटर रीडिंग आणि बिल वाटप सुरू आहे त्यात प्रचंड घोळ झाला आहे. ही बाब लोकमतने प्रकाशीत केल्यानंतर महावितरणचे अकोला परिमंडळाचा मुख्य अभियंता अरविंद भादीकर आणि अधीक्षक अभियंता दिलीप दोडके यांनी महावितरणच्या आयटी विभागाकडून सिस्टीम लॉक करण्यात आली असून, त्यात छेडछाड करता येत नाही, असे स्पष्ट केले प्रत्यक्षात मात्र महावितरणच्या आयटी विभागाचे लॉक कागदोपत्री असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.निविदेसाठी भांडणाऱ्या दोन एजन्सीच्या वादात अकोला शहरातील १ लाख ३० हजार ग्राहकांना विजेचे अतिरिक्त बिल मिळाले आहे. अव्वाच्या सव्वा मिळणारे वीज बिल वास्तविक नसून, विना रिडिंग घेता अंदाजे काढले जात असल्याच्या अनेक तक्रारी दररोज महावितरण कार्यालयात येत आहेत. तक्रारींची संख्या दिवसेंदिवस वाढत जात असल्याने महावितरणच्या अधिकारी वैतागले आहेत. एकाच ठिकाणाहून पाचशे-सहाशे ग्राहकांचे मीटर रिडिंग घेतल्या गेल्याचे चित्र जीपीएस सिस्टीममध्ये दर्शविले जात आहे. कैलास टेकडी, सिंधी कॅम्प, खदान, गीतानगर आदी भागातील अनेक ग्राहकांना याचा जबर फटका बसला आहे. २ एप्रिलपासून १६ मेपर्यंत घेण्यात आलेल्या मीटर रीडिंगमध्ये हा घोळ झालेला आहे. लॅटीट्युट २०-७११ आणि लॉगीट्युट ७६-९९ च्या क्रमांकाची पडताळणी महावितरणने केल्यास बराच प्रकार समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, अरविंद भादीकर आणि दिलीप दोडके यांनी आयटी विभागाकडून चाचपणी करण्याची तयारी मध्यंतरी दशर्विली होती. आता या चाचपणीची गरज निर्माण झाली आहे. कमी दरात घेतलेली मीटर रीडिंग आणि बिल वाटप निविदा अंगलट आल्याने कंत्राटदाराकडून हा गोंधळ होत आहे. याच धर्तीवर परभणी येथे एका एजन्सीवर फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. जर अकोल्यातील या प्रकाराची चौकशी झाल्यास येथेही कारवाई होऊ शकते, अशी स्थिती आहे.