शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

लिज संपलेली दुकाने भुईसपाट

By admin | Updated: August 1, 2014 02:23 IST

अकोला मनपाची कारवाई, मालधक्का परिसर मोकळा

अकोला : मनपाच्या अतिक्रमण विभागाने रेल्वे स्थानक परिसरातील मालधक्का तसेच न्यू इंग्लिश स्कूलजवळील लिज संपलेली अतिक्रमित १५ दुकाने गुरुवारी अक्षरश: भुईसपाट केली. तत्पूर्वी सकाळी गणेश घाट परिसरातील मच्छीविक्रेत्यांना हुसकावून लावण्यात आले.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सकाळी गणेश घाट परिसरातील मच्छी विक्रेत्यांना व्यावसायिक परवाना नसल्याच्या सबबीखाली हुसकावून लावले. पाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाण्याची विक्री करणार्‍या एका व्यावसायिकाचे अ ितक्रमित दुकान यावेळी काढण्यात आले. दुपारी शिवाजी महाविद्यालय रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपासून ते शिवाजी पार्कपर्यंत रस्त्यालगतचे अतिक्रमण जमीनदोस्त केले. तसेच मालधक्का परिसरातील पक्क्या दुकानांची लिज २00४ मध्ये संपल्यानंतर संबंधित व्यावसायिकांनी परवान्याचे नूतनीकरण केले नसल्याचे पाहणीदरम्यान समोर आले. त्यामुळे अकरम गुड्स ट्रान्सपोर्ट, केजीएन गॅरेज, भगवान कुशन, सूर्योदय हॉटेलसह तब्बल १५ दुकाने जमीनदोस्त करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने मोटार दुरुस्ती, गॅरेज व्यावसायिकांचा समावेश होता. न्यू इंग्लिश हायस्कूल ते दामले चौक ते संतोषी माता मंदिर रस्त्यावरील दुकाने काढली. ही कारवाई प्रभारी आयुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्यासह नगर रचनाकार संदीप गावंडे, राजेंद्र घनबहाद्दूर, क्षेत्रीय अधिकारी कैलास पुंडे, सहाय्यक आरोग्य अधिकारी सुरेश पुंड, विद्युत विभागाचे अमोल डोईफोडे, सुरेश अंभोरे, अ ितक्रमण विभागाचे डोंगरे, मिश्रा, बडोणे, मधुकर कांबळे यांनी पार पाडली.